पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते पत्रकारांचा विमा संरक्षण कार्डचे वितरण

Spread the love

व्हॉईस ऑफ मीडियाचा सलग तिसऱ्या वर्षी कार्यक्रम

मंत्री करणार सोलापूर ते धाराशिव लाल परी बसणेच प्रवास !

धाराशिव  (प्रतिनिधी) – राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्ह्याच्या दि.१९ व २० फेब्रुवारी असे दोन दिवशीय दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने आयोजित जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी काढण्यात येत असलेल्या संरक्षण विमा कार्डचे वितरण दि.२० फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. दरम्यान मंत्री सरनाईक हे सोलापूर ते धाराशिव हा प्रवास शासकीय मोटारीने नव्हे तर ते चक्क सर्वसामान्य प्रवास करतात त्या लाल परी बसनेच करणार आहेत.

परिवहन मंत्री तथा प्रताप सरनाईक यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- दि.१९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सोलापूर बस आगार येथून एसटीने धाराशिवकडे प्रयाण तर सायंकाळी ६ वाजता धाराशिव येथे आगमन व मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती तसेच सायंकाळी ७ वाजता धाराशिव येथून मोटारीने कळंबकडे प्रयाण तर सायंकाळी ७.४० वाजता कळंब येथे आगमन व कळंब येथील स्वागत समारंभास उपस्थिती तर रात्री ८ वाजता कळंब येथील शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिवजयंती कार्यक्रमाला उपस्थिती. तसेच शिवसेना तालीम संघ शिवजयंती उत्सवात उपस्थिती. रात्री ८.४५ वाजता बस आगार कळंबची पाहणी करून रात्री ९ वाजता सोलापूरकडे प्रयाण व मुक्काम करतील.

२० फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता सोलापूर येथून तुळजापूरकडे प्रयाण ८.४५ वाजता तुळजापूर येथे आगमन. सकाळी ८.४५ ते सकाळी ९.४५ वाजता दरम्यान आई तुळजाभवानी मातेचे कुटुंबासमवेत दर्शन व महापूजा. सकाळी ९.४५ ते १० वाजता आई तुळजाभवानी मंदिरामधील गाभाऱ्यातील दगडांना तडे गेल्या संदर्भात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी व चर्चा. सकाळी १० वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत श्री तुळजाभवानी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची १२४ भक्त निवासस्थान, तुळजापूर येथे पाहणी व सकाळी १०.१५ वाजता राणी लक्ष्मीबाई उद्यान सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहून सकाळी १०.३० वाजता तुळजापूर येथून शासकीय मोटारीने धाराशिवकडे प्रयाण करतील. सकाळी १०.५० वाजता धाराशिव येथे आगमन व व्हाईस ऑफ मिडिया पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी १२.१५ वाजता नळदुर्ग येथे आगमन व नळदुर्ग किल्ल्याची पाहणी.दुपारी दुपारी १ ते दुपारी २ वाजतापर्यंत उपजिल्हा रुग्णालय,नळदुर्ग लोकार्पण सोहळा व विविध रुग्णालय ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी २ वाजता नळदुर्ग येथून शासकीय वाहनाने सोलापूरकडे प्रयाण करतील.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *