धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र राजेश देशमुख एक्साईजचे नवे आयुक्त, विजय सूर्यवंशींकडे कोकणचा पदभार; 9 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Spread the love

राजेश देशमुखांकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यालयाचा सचिवपदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. नवीन आदेश येईपर्यंत ते हा पदभार सांभाळतील. 

मुंबई : राज्यात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच असून आताही नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख यांची राज्य उत्पादन शुल्क आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यालय सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे. तर राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांची बदली कोकण विभागाचे विभागीय आयुक्तपदी करण्यात आली आहे.

Maharashtra IAS Transfer List : कोणत्या अधिकाऱ्यांची बदली?

1. डॉ. विजय सूर्यवंशी (IAS:NON-SCS:2006) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई यांची विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


2. डॉ. राजेश देशमुख (IAS:SCS:2008) विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई यांना आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.


3. नयना गुंडे (IAS:SCS:2008) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची, महिला व बाल आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


4. विमला आर. (IAS:SCS:2009) राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई यांची निवासी आयुक्त आणि सचिव, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.


5. सिद्धराम सलीमठ (IAS:SCS:2011) जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


6. मिलिंदकुमार साळवे (IAS:SCS:2013) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.


7. डॉ. सचिन ओंबासे (IAS:RR:2015) जिल्हाधिकारी, धाराशिव यांची सोलापूर महानगरपालिका, सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


8. लीना बनसोड (IAS:NON-SCS:2015) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक यांची आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


9. राहुल कुमार मीना (IAS:RR:2021) प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली, आणि सहायक जिल्हाधिकारी, गडचिरोली उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, ZP, लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्याच आठवड्यात राज्यातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.


1. डॉ कुणाल खेमनार, आयुक्त साखर, पुणे यांची बदली एमआयडीसीचे सहव्यवस्थापक म्हणून करण्यात आली आहे.


2. मंतदा राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली यांची सिडकोच्या सहव्यवस्थापक पदावर येथे बदली करण्यात आली आहे.


3. अशोक काकडे, एमडी सारथी यांची जिल्हाधिकारी सांगली येथे बदली करण्यात आली आहे.


4. अनमोल सागर, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली भिवंडी निजामपूर मनपा आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.

  • Related Posts

    सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणावर प्रशासन करणार कारवाईहोर्डिंग्ज,बॅनर्ससाठी पूर्वपरवानगी बंधनकारक ; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.निवडणूक कालावधीत होर्डिंग्ज,बॅनर्स,पोस्टर्स…

    सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज

    Spread the love

    Spread the loveसोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन आणि IPS वृष्टी जैन यांच्याकडे जिल्ह्याची धुरा!सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *