जूनी पेन्शन मिळणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माध्यमिक शिक्षक संघटनेचे निवेदन

Spread the love

धाराशिव – १ नोव्हेंबर २००५ पूर्वीचे जाहिरात प्रसिद्ध झालेल्या व त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना शासन निर्णयानुसार जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करण्यात यावी, या बाबतचे निवेदन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद धाराशिव यांना जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनावर माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री महेश कांबळे, सोनवणे दीपक, विक्रम कदम, श्रीमती दुगम अरूणा, श्रीमती हन्नुरे झीनत , श्रीमती पठाण आफरीन , श्रीमती कौरव लीलावती , श्री. कदम विवेकानंद, सूर्यवंशी भाऊसाहेब, वाघोलीकर अभय, श्री सतीश निंबाळकर, श्री खांडेकर भैरू आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शासन निर्णय होऊनही तीन महिने झाले असतानाही सदरील शिक्षकांना लाभ न मिळाल्याने विविध प्रकारचे मागण्या करण्यात आल्या माध्यमिक शिक्षकांचे रीक्त पदे तत्काळ भरण्यात याव्यात, माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे व निवड श्रेणी मंजूर करावी मंजुरी दिलेल्या वरीष्ठ व निवड श्रेणी फरक बिल तत्काळ अदा करण्यात यावे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये, नवीन बदली धोरणानुसार शासन निर्णयानुसार माध्यमिक शिक्षकांच्याही विनंती बदली करण्यात याव्यात,याबाबतचे निवेदन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धाराशिव यांना देण्यात आले.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *