दिव्यांग व्यक्तींना नवीन वाहन खरेदीसाठी आरटीओ करमाफीचा लाभ

Spread the love

धाराशिव – (प्रतिनिधी): दिव्यांग व्यक्तींना नवीन वाहन खरेदी करताना महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम १९५८ अंतर्गत आरटीओ करमाफीचा लाभ मिळणार आहे. शासनाच्या २७ जुलै २०२१ च्या अधिसूचनेनुसार आणि गृहमंत्रालय व अवघड उद्योग मंत्रालयाच्या निर्देशांनुसार हा लाभ देण्यात येणार आहे.
करमाफीचे निकष पुढील प्रमाणे आहे.१० लाखांपर्यंतच्या वाहनांसाठी – १०० टक्के करमाफी.१० ते २० लाखांच्या वाहनांसाठी – ७५ टक्के करमाफी तर वाहनाची किंमत २० लाखांपेक्षा अधिक असेल तर ५० टक्के करमाफी परंतू अशी सूट अशा व्यक्तीच्या नावाने नोंदणी केलेल्या प्रत्येक प्रवर्गातील केवळ एकाच वाहनासाठी वैध असेल.
महत्वाची अट म्हणजे दिव्यांग व्यक्तीच्या नावावर फक्त एकाच वाहनासाठी ही सवलत लागू राहील.दिव्यांग व्यक्तींना वाहन खरेदी करताना आवश्यक सहकार्य व विविध सोयी-सुविधा पुरवाव्यात,याबाबत वाहन विक्रेत्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
दिव्यांग व्यक्तींना वाहन खरेदीदरम्यान कोणतीही अडचण आल्यास,त्यांनी तात्काळ आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी केले आहे.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *