महामंडळ लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बैठक; अडचण असलेल्या नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आमदार कैलास पाटील यांचे आवाहन

Spread the love

धाराशिव – जिल्ह्यातील विविध महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व महामंडळांच्या अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक सोमवार (ता. 10) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. आमदार कैलास पाटील यांच्या मागणीनुसार ही बैठक होत असून, यात जिल्ह्यातील सर्व महामंडळांचे मुख्य अधिकारी तसेच बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महामंडळांच्या विविध योजनांचा लाभ घेताना काही तांत्रिक अडचणी येत असल्याने अनेक नागरिकांना लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर, अशा अडचणींना सामोरे जाणाऱ्या नागरिकांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले आहे.

ही बैठक सोमवार दि. 10 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून, लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *