महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर

Spread the love

महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

मुंबई -: महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण यशस्वीपणे करण्यात आले आहे. प्रथम १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. त्यानंतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावांबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यातील १३२ आयटीआयचे नामकरण करण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली.

त्यानुसार अकोला, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, छत्र

पती संभाजीनगर, जळगाव, जालना, धाराशिव, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, बीड, बुलढाणा, भंडारा, मुंबई उपनगर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली. याबाबतचा सविस्तर निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर आजच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *