भारतीय संविधान जनजागरण रॅलीत सहभागी व्हा.. मतदार जनजागरण समितीच्या वतीने गणेश वाघमारे यांचे आवाहन.

Spread the love

धाराशिव :- दि.२६ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय संविधान दिन असून या दिना निमीत्त मतदार जनजागरण समिती धाराशिवच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भारतीय संविधान जनजागरण रॅली काढण्यात येणार आहे,या रॅलीची सुरूवात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हिरवी झंडी दाखवुन व इतर प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत बार्शी नाका माता जिजाऊ चौक येथुन दि.२६ नोव्हेंबर २०२६ वार रोजी सकाळी १०:३० वा.सुरुवात होणार आहे. गतवर्षी प्रमाणे आपण याही वर्षी रॅलीत आपल्या सहका-या सोबत सहभागी होवून “संविधान जनजागरण रॅली” ची शोभा वाढवावी.सदर रॅली श्री.भोसले हायस्कुल,जॉन मलेलु चर्च,छ. संभाजी महाराज चौक,(आर्य समाज चौक),अंबाला हॉटेल,त्रिशरण चौक,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,मारवाडी गल्ली,काळा मारूती चौक,ताजमहल टॉकीज, डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम चौक, छ.शिवाजी महाराज यांचा पुतळा,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत समारोप होणार आहे.तरी सर्वांनी भारतीय संविधान जनजागरण रॅलीत सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन मतदार जनजागरण समितीच्या वतीने कार्याध्यक्ष गणेश रानबा वाघमारे यांनी केले आहे.

  • Related Posts

    पिक विम्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा; मग पाच-पाच वर्षे शेतकऱ्यांना प्रतीक्षा का?

    Spread the love

    Spread the loveआमदार-खासदारांकडून श्रेयवादाची स्पर्धा; शेतकऱ्यांचा सवाल – इतर जिल्ह्यांना विमा मिळतो, मग धाराशिववरच अन्याय का? धाराशिव : (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळावा, यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सर्वोच्च…

    धाराशिव नगरपरिषदेला तीन नवीन अग्निशमन वाहने मिळणार; ४ कोटी ५० लाखांच्या खरेदीस शासनाची विशेष मान्यता

    Spread the love

    Spread the loveखासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती चार वाहनांची मागणी धाराशिव – : धाराशिव शहरासह परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *