दुष्काळी परिस्थितीत चारा व्यवस्थापनाचे पशुपालकांना मार्गदर्शन; मुरघास निर्मितीचे दिले तांत्रिक धडे!

Spread the love

वाशी येथे पशुधन व्यवस्थापन व दुधोत्पादन पदविका विद्यालयाच्या वतीने विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

धाराशिव (प्रतिनिधी) : आगामी काळातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पशुपालकांना चारा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करता यावे, तसेच उपलब्ध चाऱ्याचा प्रभावी वापर करून पशुधनाचे संगोपन करता यावे, या उद्देशाने वाशी येथील पशुधन व्यवस्थापन व दुधोत्पादन पदविका विद्यालयाच्या वतीने विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
उदगीर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. राजश्री पाटील व समन्वयक डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या प्रक्षेत्रावर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा उपलब्धतेचे नियोजन कसे करावे, चाऱ्याची साठवणूक कशी करावी आणि उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर कसा करावा, याबाबत पशुपालकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात निकृष्ट दर्जाचा चारा सकस बनविण्याच्या विविध पद्धतींची माहिती देण्यात आली. तसेच मुरघास (सिलाज) तयार करण्याची प्रक्रिया, त्याचे महत्त्व, साठवणूक आणि पशुधनाच्या पोषणातील उपयोग याबाबत उपस्थितांना प्रात्यक्षिकासह तांत्रिक माहिती देण्यात आली.
आगामी दुष्काळी परिस्थितीचा विचार करता पशुपालकांनी आतापासूनच ओला व सुका चारा साठविण्याचे नियोजन करावे. चाऱ्याची उपलब्धता कायम राखण्यासाठी योग्य पद्धतीने साठवणूक करणे आवश्यक असल्याचे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओंकार देशमुख यांनी केले.
या कार्यक्रमास बारामती ॲग्रोचे उंदरे साहेब, रामराजे चव्हाण, जगताप आबासाहेब, शेख मिनाज, बबनदादा सोन्ने यांच्यासह परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे आरोग्य आणि दूध उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी चारा व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा मार्गदर्शन कार्यक्रम पशुपालकांसाठी उपयुक्त ठरला.

  • Related Posts

    धाराशिव जिल्ह्यात भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक उभारणार!

    Spread the love

    Spread the loveशहरातील एका चौकाला नाव देण्याची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची घोषणा; पुढील पिढ्यांसाठी क्रांतिकारी विचारांचा वारसा जपणार आदिवासी, वंचित आणि शोषित समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे महामानव भगवान बिरसा मुंडा…

    चीनमध्ये तिरंगा उंचावणाऱ्या तुळजापूरच्या कन्येचा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते सन्मान‘मराठ्यांचे नाव सातासमुद्रापार पोहोचविलेस, तुला धन्यवाद!’ म्हणत प्रियांका हंगरगेकरचे कौतुक; तुळजापूर ते जळकोटपर्यंत जरांगे पाटलांचे जेसीबीने पुष्पवृष्टी करीत जंगी स्वागत

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर चीनच्या भूमीवर मराठ्यांचा झेंडा उंचावणाऱ्या तुळजापूरच्या कन्येचा संघर्षयोद्धा मनोज (दादा) जरांगे पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. चीनमधील जिनशान येथे झालेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *