कारखान्यात दिवाळीचा आनं दोत्सव; अधिकारी, कर्मचारी व ऊस वाहतूकदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती

कळंब तालुक्यातील श्री सिद्धिविनायक ग्रीनटेक ली खामसवाडी या कारखान्याचे संस्थापक चेअरमन दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दिपावली सणाचे औचित्य साधून कारखान्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या ड्रायवर, ऊस तोड कामगार बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे एम.डी. गणेश कामटे , संचालक प्रथमेश आवटे,चीफ इंजिनिअर अभय शिंदे,चीफ केमिस्ट बालाजी जमाले,शेतकी अधिकारी विकास उबाळे,केन अकाउंट अमित कुरुळे,प्रशासकीय अक्षय शेळके, सुरक्षा अधिकारी अनिल गायकवाड , किशोर सावंत , रविंद्र गवाड यांच्यासह कारखान्यातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच ऊस वाहतूक करणारे ड्रायव्हर, मजूर व इतर कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.