दिवाळीच्या फराळातून स्पर्धा परीक्षार्थींच्या प्रश्नांना मिळाली वाचा!विद्यार्थ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडून न्याय मिळवून देणार – आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) -: दिवाळीचा आनंद विद्यार्थ्यांसोबत साजरा करत त्यांच्या शैक्षणिक आणि रोजगारविषयक प्रश्नांना जाणून घेण्याचा उपक्रम धाराशिव येथे राबविण्यात आला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसोबत दिवाळीचा फराळ करत आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या संवादातून स्पर्धा परीक्षार्थींच्या विविध समस्या आणि मागण्या जाणून घेत त्यांच्या प्रश्नांना विधिमंडळात आवाज देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या उपक्रमामागील उद्देश केवळ दिवाळीचा आनंद साजरा करणे नसून, स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेणे हा होता. यावेळी पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार, दूरच्या जिल्ह्यांत परीक्षा केंद्रे मिळणे, वारंवार परीक्षा शुल्क भरावे लागणे, बेरोजगारी आणि शासकीय पदांची रखडलेली भरती या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

धाराशिवमध्ये दर्जेदार शासकीय अभ्यासिकांची कमतरता, २४ तास अभ्यासिका व ग्रंथालय सुविधा, डिजिटल लायब्ररी, इंटरनेट आणि अभ्यास साहित्याची उपलब्धता, तसेच मुलींसाठी सुरक्षित अभ्यासिका व वसतिगृहांची आवश्यकता याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले.
वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष संधी, कंत्राटी भरतीऐवजी नियमित पदभरती, परीक्षा शुल्कात सवलत, शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहाय्य अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांनी मांडल्या. अनेक वर्षे अभ्यास करूनही यश न मिळाल्याने निर्माण होणारा मानसिक ताण, कुटुंबाचा आर्थिक दबाव आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाचा अभाव या समस्यांवरही मनमोकळा संवाद झाला.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांना सादर केले. या सर्व प्रश्नांवर शासनदरबारी पाठपुरावा करून आवश्यक कार्यवाहीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी बोलताना आमदार डॉ. पाटील म्हणाले, “मला केवळ तुमच्या समस्या ऐकायच्या नाहीत, तर त्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासनदरबारी आवाज उठवायचा आहे. तुम्ही तुमच्या अडचणी निर्भीडपणे मांडा. तुमच्या प्रश्नांना विधिमंडळात न्याय मिळवून देण्यासाठी मी निश्चितच प्रयत्नशील राहीन.”
या संवाद सत्राच्या आयोजनात गोविंद हजारे सर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणे, त्यांच्या संघर्षात सहभागी होणे आणि शिक्षण, स्पर्धा परीक्षा व रोजगारासंबंधीच्या प्रश्नांना विधिमंडळात प्रभावीपणे मांडणे, ही आपली जबाबदारी असल्याचे आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

  • Related Posts

    KIDONEST NETWORK PVT. LTD. च्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ व उत्पादन लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न तर SOLAPUR NEST NAVIGATORS चा नूतनीकरण व नूतन स्वरूपात शुभारंभ..

    Spread the love

    Spread the loveसोलापूर :- सोलापूर येथे KIDONEST NETWORK PVT. LTD. च्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ व उत्पादन लोकार्पण सोहळा अशोक चौक, पाचापेठ, गोविंद मेडिकल शेजारी, सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.…

    दुष्काळाच्या झळांमध्ये ६०० गरजू महिलांची दिवाळी गोड; खासदार ओमराजेंचा मदतीचा हात!

    Spread the love

    Spread the loveप्रभाग क्रमांक ४ मध्ये दिवाळी शिधा किटचे वाटप; शिवसेना नेते प्रशांत (बापू) साळुंके यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय धाराशिव : दुष्काळाच्या झळांनी सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना गोरगरीब…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *