
सोलापूर :- सोलापूर येथे KIDONEST NETWORK PVT. LTD. च्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ व उत्पादन लोकार्पण सोहळा अशोक चौक, पाचापेठ, गोविंद मेडिकल शेजारी, सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. याच सोहळ्याच्या निमित्ताने SOLAPUR NEST NAVIGATORS चा नूतनीकरण व नूतन स्वरूपात शुभारंभ करण्यात आला.या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून नव्या संकल्पना, आधुनिक दृष्टिकोन आणि प्रगतीच्या दिशेने एक नवी सुरुवात करण्यात आली. नवीन कार्यालय व उत्पादन लोकार्पणामुळे संस्थेच्या कार्याला नवी दिशा आणि गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती बांधकाम

व्यावसायिक किशोर चंडक, भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर,सामाजिक कार्यकर्ते तथा सदस्य, सुरक्षा समिती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव गणेश रानबा वाघमारे, जिल्हा ग्राहक आधार संघटनेचे अध्यक्ष संजय गजधने, राजाभाऊ पवार, विशाल घरबुडवे, आयुष वाघमारे,अनुरथ गजधने, स्वामी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी KIDONEST NETWORK PVT. LTD. च्या नवीन कार्यालयाच्या शुभारंभाबद्दल तसेच SOLAPUR NEST NAVIGATORS च्या नूतन स्वरूपातील प्रारंभाबद्दल भारतीय संविधान उद्देशिका देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले. संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी यश, भरभराट आणि उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.तर आयोजकांनी पाहुण्यांचे स्वागत पुष्प बुके देऊन केले,कार्यक्रमाचे आयोजक नागेश कोकरे,सागर कटकधोंड,गौतम क्षिरसागर,रमीत जैन (CEO),सह इतर उपस्थित होते.