नशामुक्त युवा फॉर विकसित भारत जिल्हास्तरीय स्पर्धेत युवकांनी सहभागी व्हावे

Spread the love

धाराशिव – : माय भारत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ या अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय विविध सांस्कृतिक, साहित्यिक व सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

व्यसनमुक्ती बाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, यांच्या सृजनशीलतेला वाव देणे आणि विकसित भारताच्या उभारणीत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या स्पर्धेमध्ये लोकगीत( सामूहिक), सामूहिक नृत्य, पथनाट्य, चित्रकला, शॉर्ट फिल्म-रील, घोषवाक्य लेखन, स्लॅम पोएट्री (मौखिक कविता) तसेच भाषण स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. सर्व स्पर्धा ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ या विषयावर आधारित असून, व्यसनमुक्ती, निरोगी जीवनशैली, सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारत निर्मितीत युवकांची भूमिका या विषयांवर स्पर्धकांनी आपले सादरीकरण करावे.

या स्पर्धांचे आयोजन दिनांक 30 जुलै 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), तुळजापूर येथे करण्यात आले आहे.

15 ते 29 वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, माय भारत, धाराशिव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा युवा अधिकारी, माय भारत, धाराशिव यांच्याशी 7498134147/9420200649 ह्या भ्रमणध्वनी क्रमांकावर अथवा mybharatdharashiv@gmail.com या ई-मेलद्वारे संपर्क साधावा.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *