‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

Spread the love

बन्सीलाल पांचाल, पर्वत कुमार मिश्रा, कौशिक अधिकारी आणि बालाजी ए. यांची विभागीय राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

देशभरातील पत्रकारांना एकत्र आणण्याच्या दिशेने व्हॉईस ऑफ मीडियाचे महत्त्वपूर्ण पाऊल

नवी दिल्ली : देशभरातील पत्रकारांना एकाच व्यासपीठावर संघटित करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम आंतरराष्ट्रीय फोरमने २८ सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या कार्यकारिणीत देशातील १६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील प्रतिनिधींना स्थान देण्यात आले असून, संघटनेच्या राष्ट्रीय विस्ताराला आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीला नवी दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नेतृत्वाची धुरा अनिल म्हास्के (महाराष्ट्र) यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सोपविण्यात आली आहे.

यात प्रादेशिक पातळीवर बन्सीलाल पांचाल (हरियाणा) यांची उत्तर विभाग, पर्वत कुमार मिश्रा (ओडिशा) यांची पूर्व विभाग, कौशिक अधिकारी (त्रिपुरा) यांची ईशान्य विभाग आणि बालाजी ए. (तामिळनाडू) यांची दक्षिण विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निरंजन शर्मा (मध्य प्रदेश), सुमन गांगुली (पश्चिम बंगाल), श्रीकृष्ण चांडक (महाराष्ट्र) आणि अशोक वानखेडे (दिल्ली) यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय समन्वयक म्हणून अंजली दुबे (उत्तर प्रदेश), रंजना शुक्ला (हरियाणा), हराधन पॉल (त्रिपुरा), दयानंद चौधरी (त्रिपुरा), हरीशेंद्र निषाद (उत्तर प्रदेश), शिबानंद पटनायक (ओडिशा), सुमित तिवारी (उत्तराखंड) आणि ज्योतिंद्र सिंह (मणिपूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय संघटक म्हणून गिरीश भटेले (मध्य प्रदेश), ओकेनजीत सुंधाम (नागालँड), अमित रॉय (पश्चिम बंगाल), पारुल शर्मा (हिमाचल प्रदेश) आणि हितेश मारू (गुजरात) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून सुनील जोसेफ (केरळ), उत्तम दीक्षित (राजस्थान), स्वप्ना दत्ता (आसाम), अक्षित महाजन (जम्मू-काश्मीर) आणि राजेश दुबे (बिहार) यांचा समावेश करण्यात आला आहे.

या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र, तामिळनाडू, हरियाणा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा, उत्तराखंड, मणिपूर, नागालँड, हिमाचल प्रदेश, गुजरात, केरळ, आसाम, बिहार तसेच केंद्रशासित प्रदेश दिल्ली आणि जम्मू-काश्मीर या भागांतील प्रतिनिधींना स्थान देण्यात आले आहे.

देशभरातील पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, पत्रकार कल्याण, संघटनात्मक विस्तार, प्रशिक्षण, सामाजिक सुरक्षा आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी राष्ट्रीय स्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने ही कार्यकारिणी कार्यरत राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. विविध भाषा, संस्कृती आणि प्रदेशांचे प्रतिनिधित्व असलेली ही कार्यकारिणी व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हास्के यांनी कार्यकारिणीची घोषणा करताना भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “व्हॉईस ऑफ मीडिया ही केवळ एक संघटना नसून देशभरातील पत्रकारांना जोडणारे एक मोठे कुटुंब आहे. आज १६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील सहकाऱ्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाल्याने संघटनेचा राष्ट्रीय विस्तार अधिक भक्कम झाला आहे. प्रत्येक पदाधिकारी पत्रकारांच्या हक्कांसाठी, त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी आणि संघटनात्मक बळकटीसाठी समर्पित भावनेने कार्य करेल, असा मला विश्वास आहे. विविध भाषा, संस्कृती आणि प्रदेशांना जोडत देशातील पत्रकारांची एकजूट निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. आगामी काळात व्हॉईस ऑफ मीडिया प्रत्येक राज्यात अधिक सक्षमपणे कार्यरत राहील आणि पत्रकारांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रीय स्तरावर प्रभावी आवाज बनून उभा राहील.”

यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी नव्याने जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अभिनंदन करत सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “ही कार्यकारिणी देशातील पत्रकारांच्या अपेक्षा पूर्ण करणारे सक्षम नेतृत्व देईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. संघटनेच्या विचारांशी निष्ठा ठेवून पत्रकार कल्याण, पत्रकारांचे हक्क आणि राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक विस्तारासाठी सर्व पदाधिकारी एकजुटीने कार्य करतील. देशातील प्रत्येक पत्रकारापर्यंत व्हॉईस ऑफ मीडियाचे कार्य पोहोचवून पत्रकार सशक्तीकरणाचा संकल्प अधिक व्यापक करण्यासाठी ही टीम महत्त्वाची भूमिका बजावेल. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.”

  • Related Posts

    पत्रकारितेच्या सक्षमीकरणाचा निर्धार; व्हॉईस ऑफ मीडिया च्या राष्ट्रीय अधिवेशनाची उत्साहात सांगता

    Spread the love

    Spread the loveपत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर नवी दिल्ली : देशभरातील पत्रकारांना एकाच व्यासपीठावर आणणारे, पत्रकारितेच्या वर्तमान आणि भविष्यातील दिशेचा वेध…

    पत्रकारांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी; ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव | प्रतिनिधीपरंडा तालुक्यातील निजाम जवळा येथील शेतकरी बाबुशा सुपनास पवार यांच्या शेतातील शेड पाडण्यात आल्याची घटनेची वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार प्रभाकर लोंढे आणि कॅमेरामन अण्णाभाऊ लोंढे यांच्याविरोधात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *