जागतिक पातळीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची भक्कम झेप; सदस्य नोंदणी अभियानाचा मुंबईत शुभारंभ

Spread the love

“प्रत्येक सदस्य हा जागतिक प्रतिनिधी” – संदीप काळे

“अचूक माहिती आणि संघटनच खरी ताकद” – चंद्रमोहन पुपाला

मुंबई : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या वतीने जागतिक सदस्य नोंदणी अभियानाचा आज मुंबई येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि त्यांना जागतिक स्तरावर एक सक्षम, प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाला संस्थापक, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, संचालक तथा आंतरराष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला, राष्ट्रीय कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, आंतरराष्ट्रीय प्रमुख गगन महोत्रा तसेच संचालक व सीईओ सारिका पन्हाळकर-महोत्रा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते सदस्य नोंदणी प्रक्रियेचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला.

या उपक्रमामुळे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची चळवळ आता स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरून थेट जागतिक स्तरावर झेप घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्रकारांना केवळ एकत्र आणणे नव्हे, तर त्यांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा देणे, त्यांना कायदेशीर संरक्षण, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देणे हा या अभियानामागील मूलभूत उद्देश आहे. आजच्या डिजिटल युगात पत्रकारांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत एक सशक्त आणि जागतिक स्तरावर जोडलेले नेटवर्क उभे करणे ही काळाची गरज असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले. चोवीस, आठ, अकरा याप्रमाणे ही नोंदणी जगातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना संदीप काळे यांनी सांगितले की, “आजचा दिवस ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आपण केवळ एक संघटना वाढवत नाही, तर जगभरातील पत्रकारांना एकत्र आणणारी चळवळ उभारत आहोत. पत्रकारांच्या हक्कांसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी ही सदस्य नोंदणी मोहीम निर्णायक ठरणार आहे. प्रत्येक पत्रकाराने या अभियानात सहभागी होणे ही आजच्या काळाची गरज आहे. आपण स्थानिक पातळीवरून जागतिक पातळीवर जात आहोत आणि या प्रवासात प्रत्येक सदस्य हा आमचा प्रतिनिधी आहे. यामुळे आपण पत्रकारांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडू शकू.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की मदत आणि संरक्षण सर्व पत्रकारांना मिळेल; मात्र थेट लाभ त्या सदस्यांनाच मिळेल ज्यांनी अधिकृत सदस्य नोंदणी फॉर्म भरलेला आहे.

या सदस्य नोंदणी प्रक्रियेमध्ये फॉर्म भरण्याला अत्यंत महत्त्व दिले जात आहे. प्रत्येक पत्रकाराची अधिकृत माहिती संघटनेकडे उपलब्ध होणे ही या प्रक्रियेची पहिली पायरी असून, यामुळे सदस्यांना अधिकृत ओळख मिळते आणि संघटनेशी त्यांचे नाते अधिक दृढ होते. याशिवाय देश-विदेशातील पत्रकारांचा सुसंगत आणि अद्ययावत डेटाबेस तयार होतो, ज्यामुळे संवाद, समन्वय आणि नेटवर्किंग अधिक सुलभ होते. भविष्यातील योजना, विमा सुविधा, प्रशिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी ही माहिती अत्यावश्यक ठरणार आहे. त्यामुळे सदस्य नोंदणी फॉर्म भरणे ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून, पत्रकारांच्या सुरक्षित आणि सक्षम भविष्यासाठी एक भक्कम पाया आहे.

तसेच पत्रकारांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आंदोलन उभे करणे आणि शासन पातळीवर ठोस प्रतिनिधित्व करणे यासाठीही ही नोंदणी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. संघटित शक्ती निर्माण करण्यासाठी प्रत्येक सदस्याची अचूक नोंद आणि सक्रिय सहभाग गरजेचा असतो. त्यामुळे या अभियानाद्वारे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ एक व्यापक, सुसंगत आणि प्रभावी संघटनात्मक रचना उभी करत आहे.

‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या माध्यमातून आता विविध देशांतील पत्रकार एकाच छत्राखाली येणार असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या हक्कांसाठी एक मजबूत आणि प्रभावी आवाज निर्माण होणार आहे. या उपक्रमामुळे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची ओळख अधिक व्यापक होणार असून, पत्रकारांच्या सन्मान आणि सुरक्षिततेसाठी एक नवा अध्याय सुरू झाल्याचे मानले जात आहे. आगामी काळात या जागतिक सदस्य नोंदणी मोहिमेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

संचालक तथा आंतरराष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला यांनी सांगितले की, “आजच्या काळात केवळ संख्या नव्हे, तर अचूक आणि सुसंगत माहिती असलेले संघटनच प्रभावी ठरते. सदस्य नोंदणीच्या माध्यमातून आपण प्रत्येक पत्रकाराशी थेट जोडले जात आहोत. यामुळे देश-विदेशातील पत्रकारांमध्ये समन्वय वाढेल आणि कोणत्याही परिस्थितीत एकत्रितपणे प्रतिसाद देणे शक्य होईल. ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या माध्यमातून आपण जागतिक स्तरावर एक सशक्त आणि जबाबदार पत्रकार नेटवर्क उभे करत आहोत.”

फोटो ओळ:

“‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या जागतिक सदस्य नोंदणी अभियानाचा मुंबईत शुभारंभ; संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, संचालक तथा आंतरराष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला, राष्ट्रीय कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, आंतरराष्ट्रीय प्रमुख गगन महोत्रा तसेच संचालक, सीईओ सारिका पन्हाळकर-महोत्रा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.

  • Related Posts

    पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    Spread the love

    Spread the loveविविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान आणि पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण धाराशिव – महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान राखला गेला पाहिजे.पत्रकारांचे कार्य अत्यंत आव्हानात्मक असून ते निष्ठेने…

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी धाराशिवमध्ये – कै अनंत भालेराव पत्रकारिता पुरस्कार व पुण्यनगरी बक्षीस व पुरस्कार वितरण.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी 12 एप्रिल रोजी धाराशिव शहरामध्ये येणार आहेत. शिंदे यांच्या हस्ते धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कै अनंत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *