शिधापत्रिका व शासकीय प्रमाणपत्रांच्या सर्व सेवा आता ऑनलाइन; दलालांपासून सावध राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) : राज्य शासनाने केशरी, पिवळी व शुभ्र अशा पुस्तकी स्वरूपातील शिधापत्रिका बंद करून त्याऐवजी डिजिटल ऑनलाइन शिधापत्रिका वितरणाची प्रणाली लागू केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय १६ मे २०२३ रोजी जारी करण्यात आला असून नागरिकांनी शिधापत्रिका व इतर पुरवठा विभागाच्या सेवांसाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.सध्या शिधापत्रिकांचे AAY, PHH, APL Farmer, NPH आणि APL White असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. पुरवठा विभागातील सर्व कामकाज महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे केले जात असून शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नवीन नाव समाविष्ट करणे, नवीन शिधापत्रिका मिळविणे, शिधापत्रिकेची दुय्यम प्रत प्राप्त करणे तसेच इतर विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी या सेवांसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत. संबंधित संकेतस्थळावरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. अर्जदारांनी स्वतः ऑनलाइन अर्ज केल्यास शासनाच्या GRAS प्रणालीद्वारे शुल्क भरावे लागणार आहे. यामध्ये NPH शिधापत्रिकेसाठी ५० रुपये तर APL White शिधापत्रिकेसाठी १०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय विविध शासकीय प्रमाणपत्रे व निराधार योजनांसाठीही शासनाने शुल्क निश्चित केले आहे.नागरिकांनी कोणत्याही एजंट, दलाल किंवा अनधिकृत व्यक्तीकडे कागदपत्रे देऊ नयेत. आवश्यक असल्यास शासनमान्य सुविधा केंद्रांची मदत घेऊन नियमानुसार शुल्क भरावे. फसवणुकीच्या प्रकारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.याबाबतचे आवाहन नायब तहसीलदार सामाजिक सहाय्य योजना एम. जी. शिंदे, नायब तहसीलदार महसूल-२ तथा पुरवठा निरीक्षण अधिकारी विशाखा बलकवडे आणि तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी केले आहे.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *