पत्रकार आणि कुटुंबियांसाठी उद्या धाराशिवमध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिर

Spread the love

पत्रकार आणि कुटुंबियांसाठी उद्या धाराशिवमध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिर

धाराशिव – दर्पण अर्थात पत्रकार दिनानिमित्त सोमवारी  धाराशिव शहरातील पल्स हॉस्पिटल येथे पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात पत्रकारांच्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी तसेच औषधोपचार करण्यात येणार आहेत.
धाराशिव जिल्हा पत्रकार संघ आणि पल्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, 2 डी इकोसह हाडांची,डोळ्यांची तपासणी व विविध तज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जाणार आहेत.

पल्स हॉस्पिटल येथे सकाळी सात वाजता आरोग्य शिबिराला सुरुवात होईल. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आमदार कैलास पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.
आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, सरचिटणीस भीमाशंकर वाघमारे, धाराशिव तालुकाध्यक्ष मच्छिंद्र कदम, पल्स हॉस्पिटलचे डॉ.तानाजी लाकाळ,डॉ. रणजीत कदम यांनी केले आहे.

  • Related Posts

    गडकोट विकास महामंडळासाठी जागर प्रतिष्ठानचा लढा तीव्र; तुळजापूरात किसन पाटील चव्हाण यांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी

    Spread the love

    Spread the loveराज्यातील १२० तालुक्यांतील तहसील कार्यालयांना निवेदन; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा – इतिहासप्रेमींची मागणी

    अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ( प्रतिनिधी )स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन साजरा करताना आपण त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाला स्मरण करतो. पण त्याच संभाजी महाराज यांच्या स्मारकाच काम संथ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *