करजखेडा पाटीजवळ भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, चार जण गंभीर जखमी

Spread the love

लातूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर करजखेडा पाटीजवळ रविवारी भीषण आणि विचित्र अपघात घडून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगातील बोलेरो वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. नियंत्रण सुटलेल्या बोलेरोने प्रथम समोरून येणाऱ्या वॅगनआर कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर बोलेरो पलटी होऊन रस्त्याच्या दुसऱ्या लेनमध्ये जाऊन स्विफ्ट कारवर आदळली.

या तिहेरी धडकेत अपघात अत्यंत भीषण झाला असून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी धाराशिव व सोलापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

पोलीस पुढील तपास करत आहेत.

  • Related Posts

    साखरपुड्यानंतर चारच दिवसांत काळाचा घाला; सोलापूर–धुळे महामार्गावर भीषण अपघातात नववधू-वराचा जागीच मृत्यू

    Spread the love

    Spread the loveवाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय रामभाऊ शिनगारे (वय २५) आणि इजोरा येथील, सध्या मुक्काम वाशी येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया सुनील चव्हाण (वय…

    सोलापूर हादरले: भरधाव वाहनाच्या धडकेत तीन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू

    Spread the love

    Spread the loveमहाशिवरात्रीच्या आनंदावर विरजण सोलापूर शहरात सोमवारी पहाटे एक अत्यंत दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अज्ञात अवजड वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत तीन तरुण मित्रांचा जागीच करुण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *