समुपदेशन कक्ष व व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्षाचे उद्घाटन; न्यायप्रक्रियेला नवी गती

Spread the love

बुलढाणा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे आज दि. १२ फेब्रुवारी रोजी समुपदेशन कक्ष व व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.

⚖️ समुपदेशन कक्ष – कौटुंबिक व दिवाणी वाद तडजोडीच्या मार्गाने सोडविण्यास मदत, न्यायालयीन तणाव कमी, जलद व सुलभ न्यायाची सुविधा.

🎥 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्ष – जेलमधील बंद्यांशी थेट संपर्क, साक्षीदारांची साक्ष ऑनलाइन नोंदणी, न्यायप्रक्रिया अधिक वेगवान, सुरक्षित व खर्चबचतीची दिशा.

कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. आर. एन. रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. समुपदेशन कक्षाचे उद्घाटन मा. डॉ. किरण पाटील (जिल्हाधिकारी) तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्षाचे उद्घाटन मा. निलेश तांबे (पोलीस अधीक्षक) यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमास न्यायाधीश, वकिल संघाचे पदाधिकारी, विधीज्ञ, तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

👏 कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी मा. नितीन एन. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे विशेष अभिनंदन.

  • Related Posts

    सोलापूरात ४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ; ४९ ज्येष्ठ वकिलांचा सहभाग

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – दि. ३० जुलै : मुख्य मध्यस्थी देखरेख समिती, मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४० तासांच्या मध्यस्थी…

    गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय मिळवून देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे ध्येय ,सचिव भाग्यश्री पाटील

    Spread the love

    Spread the loveसामाजिक समता सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशांचे वितरण धाराशिव -: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *