सैनिकी मुलांच्या वसतीगृहात अशासकीय अधिक्षक पदासाठी माजी सैनिकांना संधी

Spread the love

धाराशिव – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सैनिकी मुलांच्या वसतीगृहात अशासकीय वसतिगृह अधिक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.हे पद निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात असून एकत्रिक मानधनावर भरण्यात येणार आहे.

या पदासाठी पात्र आणि इच्छुक माजी सैनिक (JCOs) यांनी स्वतःची मूळ कागदपत्रे,डिस्चार्ज बुक,पी.पी.ओ.,माजी सैनिक ओळखपत्र तसेच आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव येथे अर्ज सादर करावेत.

कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी 11 वाजता पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02472-222557 किंवा 7588527554 वर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.

  • Related Posts

    पोलीस अधीक्षक, धाराशिव चालक पोलीस शिपाई भरती – 2024-2025. सुचना

    Spread the love

    Spread the loveपोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या चालक पोलीस शिपाई (25) पदांच्या भरती प्रकियेकरीता घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी मधून लेखी परिक्षेकरीता पात्र झालेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा दिनांक…

    धाराशिवात चालक पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा उद्या

    Spread the love

    Spread the love२५ पदांसाठी प्रक्रिया; पारदर्शकतेसाठी कडक नियम, सीसीटीव्ही देखरेखीखाली परीक्षा धाराशिव : पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव यांच्या आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई (२५) पदांच्या भरती प्रक्रियेला वेग आला असून, मैदानी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *