जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात ३ ‘कोरडे दिवस’ ; मतदान व मतमोजणी काळात मद्यविक्री बंद

Spread the love

धाराशिव – राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद धाराशिव तसेच धाराशिव,कळंब,भूम,परांडा,वाशी, तुळजापूर,उमरगा व लोहारा या ८ पंचायत समिती सदस्यांसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक प्रक्रिया खुल्या,मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी तसेच सार्वजनिक शांतता व कायदा – सुव्यवस्था अबाधित राहावी,या उद्देशाने जिल्हाधिकारी तथा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकार वापरून जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी जिल्ह्यातील निवडणूक असलेल्या संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचन क्षेत्रांमध्ये मद्यविक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

हे आदेश महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री, नोंदवहया इत्यादी) नियम १९६९ मधील नियम ९ (अ) मधील २ (क) (२) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम,१९४९ चे कलम १४२ (१) अन्वये देण्यात आले आहेत.

या आदेशानुसार दि.६ फेब्रुवारी २०२६ (मतदानाचा आदला दिवस) रोजी संबंधित निर्वाचन क्षेत्रांमध्ये (संबंधित ठिकाणचे नगरपरिषद,नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्र वगळता) संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे.दि.७ फेब्रुवारी २०२६ (मतदानाचा दिवस) रोजी संबंधित निर्वाचन क्षेत्रांमध्ये (नगरपरिषद, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्र वगळता) संपूर्ण दिवस बंदी राहील,तर दि.९ फेब्रुवारी २०२६ (मतमोजणीचा दिवस) रोजी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात मद्यविक्री संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत देशी व विदेशी मद्याच्या घाऊक व किरकोळ विक्रीच्या तसेच ताडी विक्रीच्या सर्व अनुज्ञप्त्या — नमुना एफएल-१,एफएल-२,एफएल-३, एफएल-४ (क्लब अनुज्ञप्ती),एफएल/बीआर-२,सीएल-२,सीएल-३,सीएल/एफएल,टिओडी-३,टिडी-१ इत्यादी बंद राहणार आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले असून, आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा,१९४९ मधील कलम ५४ व ५६ मधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल,असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

  • Related Posts

    ८ ऑगस्टपर्यंत गणनापत्र (Enumeration Form) भरण्याचे आवाहन; मतदार यादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी तहसील प्रशासनाची नागरिकांना सूचना

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (S.I.R.) 2026 अभियानांतर्गत धाराशिव तालुक्यातील सर्व मतदारांनी आपले गणनापत्र (Enumeration Form – EF) वेळेत भरावे, असे…

    निरक्षर,अक्षर ओळख नाही – सहायकासाठी 41 मतदारांचे अर्ज, घोडेबाजारासाठी क्लुप्ती

    Spread the love

    Spread the loveमतपत्रिकेवर उमेदवाराचा फोटो तरीही हवा सहायक, छानणी सुरु – विधान परिषद निवडणुक धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज विधान परिषदेच्या उस्मानाबाद बीड व लातुर या स्थानिक स्वराज मतदार संघासाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *