१३ ते २२ जानेवारी दरम्यान हजरत ख्वाजा शमशोद्दीन उर्स

Spread the love

धाराशिव दि ०३ – हिंदू – मुस्लिम भाविकांच्या एकात्मतेचे प्रतिक असलेल्या धाराशिव येथील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहे यांच्या ७२० उर्स १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे.१३ ते २२ जानेवारी दरम्यान उर्सचे आयोजन करण्यात येणार आहे.ऊर्सची ही परंपरा ७२० वर्षापासून सुरू आहे.या ऊर्समध्ये दरवर्षी संदल मिरवणूक,कव्वाली,मुशायरा, शबे गजल,महफिल-ए-समा व वाजबयान इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.यावर्षी देखील १३ जानेवारीपासून उर्सला सुरुवात होत आहे.
१३ जानेवारीला सायंकाळी ७ ते रात्री ९ – पंखा मिरवणूक,१४ जानेवारी सायंकाळी ७ ते रात्री ९ -सेहरा मिरवणूक,१५ जानेवारी सायंकाळी ७ ते रात्री ९ – गुसल पाणी मिरवणूक,१६ जानेवारी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत – मुख्य संदल मिरवणूक व महेफील – ए -समा,१७ जानेवारी रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत – चिरागा कार्यक्रम व कव्वाली कार्यक्रम, महफिल – ए – समा,१८ जानेवारी सकाळी १० वाजता दर्गा येथे – जिरायत कार्यक्रम व रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत – कवाली कार्यक्रम,१९ जानेवारी रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत – वाजबयान व नाते शरीफ कार्यक्रम, २० जानेवारी रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत – मुशायरा कार्यक्रम,२१ जानेवारी रात्री १० ते पहाटे २ वाजेपर्यंत – गझल कार्यक्रम आणि २२ जानेवारी दुपारी ३ वाजता – कुस्ती स्पर्धा आणि रात्री ९:३० वाजता – आतिषबाजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
हे सर्व कार्यक्रम महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळामार्फत साजरे केले जाणार आहे.दर्गा हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहे यांचा वार्षिक उर्सचे चांगल्याप्रकारे आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन काम करीत आहे. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांवर या तयारीच्या दृष्टीने जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेल्या आहेत.

  • Related Posts

    तगर भूमी जेतवन बुद्ध विहारात वर्षावास महोत्सवाचे आयोजन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्षावास निमित्त निसर्गाच्या सानिध्यात तगर भुमी जेतवन बुद्ध विहार,गडदेवदरी परिसर,धाराशिव येथे वर्षावास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मौजे गडदेवदरी घाटंग्री परिसर ता.जि.धाराशिव येथे तीन…

    ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

    Spread the love

    Spread the loveईद-ए-मिलाद निमित्त नगरसेवक अझहर मुजावरांचा उपक्रम; एसीएम ग्रुपच्या रक्तदान शिबिरात २००-३०० युवकांचा सहभाग धाराशिव – “पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.)” यांच्या जन्मदिनी साजरा केला जाणारा ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांसाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *