पुणे महानगरपालिकेच्या जागरूकतेमुळे अपघाती निधन झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास र. रु. १० लक्ष विम्याची रक्कम प्राप्त

Spread the love

मे. सिद्धीविनायक एन्टरप्रायजेस या पुणे महानगरपालिकेस कंत्राटी कामगार सेवा पुरविणाऱ्या संस्थेकडील कंत्राटी कामगार कै. निवांत दशरथ अवसरे यांचे त्यांचे गावी जात असताना अपघात होऊन निधन झाले. सदर कामगारास वैयक्तिक अपघात विम्याचे सुरक्षा कवच असल्याने पुणे महानगरपालिका व ठेकेदार संस्था यांच्या प्रयत्नाने त्यांचे पात्र वारसासाठी विमा क्लेम मान्य करून घेण्यात आला. दि.२१/०१/२०२६ रोजी, सदर दिवंगत कामगाराच्या वारस, दिवंगत कामगाराची पत्नी श्रीमती साक्षी निवांत अवसरे यांना र.रु.१० लक्ष विम्याचा धनादेश मा. पवनीत कौर (भा.प्र.से.), अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज.) यांचे हस्ते देण्यात आला. यावेळी मा. मुख्य कामगार अधिकारी श्री.नितीन केंजळे, मा. उप कामगार अधिकारी श्री.बुगप्पा कोळी, ठेकेदार संस्थेचे प्रोप्रायटर मा. श्री. दादासाहेब झेंडे तसेच दिवंगत कामगाराची पत्नी मा. श्रीमती साक्षी निवांत अवसरे व वडील उपस्थित होते.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *