लोणावळ्यातील धर्मेंद्र यांचे आलिशान फार्म हाऊस; आठवणींच्या रूपाने आजही जिवंत

Spread the love

लोणावळा | प्रतिनिधी – “शेवटी राहतात त्या फक्त आठवणी…” हा भाव व्यक्त करणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे लोणावळ्यातील आलिशान फार्म हाऊस आज पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात घर करून आहे. लोणावळ्याजवळील आवंढे गावात वसलेले हे फार्म हाऊस निसर्गाच्या कुशीत दिमाखात उभे असून, धर्मेंद्र यांच्या साध्या, प्रेमळ आणि निसर्गनिष्ठ जीवनशैलीचे दर्शन घडवते.

परिसरात एक शांत तलाव, आजूबाजूला घनदाट झाडी आणि डोंगरांच्या रांगा अशी निसर्गरम्य सजावट या फार्म हाऊसला लाभली आहे. बॉलिवूड चित्रपटांत दिसणाऱ्या आलिशान घरांसारखेच हे संपूर्ण बांधकाम अत्यंत आकर्षक पद्धतीने उभारले असून, घरात स्विमिंग पूल, फाउंटन, फुलझाडांची सुंदर बाग, तसेच गाईंसाठी स्वतंत्र गोठा अशा सुविधा उपलब्ध आहेत.

धर्मेंद्र यांनी येथे सेंद्रिय शेतीचा मनापासून स्वीकार केला होता. स्वतः उगवलेल्या फळभाज्यांचा आस्वाद घेणे, प्राण्यांची काळजी घेणे हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता. परिसरातील कामगारांशी त्यांनी मनापासून जिव्हाळ्याचे नाते जपले होते. त्यांचा मुलगा सनी देओलही येथे वेळोवेळी भेट देत असे.

मात्र काल धर्मेंद्र यांनी या जगाचा निरोप घेतल्याने चित्रपटसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. तरीदेखील त्यांचे लोणावळ्यातील हे स्वप्नवत घर, तिथला प्रत्येक कोपरा आणि निसर्गमय वातावरण आजही त्यांच्या असंख्य आठवणी जपून ठेवत आहे.

धर्मेंद्र यांची उपस्थिती नसली तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांचे निसर्गप्रेम या फार्म हाऊसच्या रूपाने सदैव जिवंत राहणार आहे.

  • Related Posts

    बीएलओचे काम पाहणारे शिक्षक इंगळे यांचा अपघाती मृत्यू

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  (प्रतिनिधी) – तालुक्यातील बेंबळी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले व सध्या बीएलओचे कर्तव्य पार पाडणारे गोविंद इंगळे रा‌.कनगरा ता. धाराशिव (वय – ५० वर्षे)…

    आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय; तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली ३० तासांची झुंज यशस्वी,तेरणा नदीत बुडालेल्या अमरचा मृतदेह अखेर सापडला; तेर गावावर शोककळा..

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज प्रतिनिधी…. धाराशिव तालुक्यातील तेर येथे संत गोरोबाकाका मंदिराजवळ तेरणा नदीच्या पात्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ३० तासांच्या अथक, समन्वयित आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर अखेर सापडला. या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *