366 वा शिवप्रताप दिन व समिती स्थापना दिन साजरा

Spread the love

धाराशिव – सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सरदार अफजलखान यास ठार मारून मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा दिवस म्हणजे 366 वा शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. आज पासून बरोबर 366 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी बादशाहीचे अफजलखान रुपी आलेले संकट प्रतापगडाच्या पायथ्याशी ठार मारून ऐतिहासिक विजय संपादन केला होता. दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव या ऐतिहासिक दिनाची स्मृती जागृत व जतन करण्यासाठी हा दिवस शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 10 नोव्हेंबर 2003 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून सतत शिवकार्य करणारी समिती संपूर्ण जिल्हाभर कार्यरत आहे. 366 वा शिवप्रताप दिन व शिवराज्याभिषेक सोहळा समिती स्थापना दिन या दोन्हींच्या निमित्ताने आज धाराशिव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक व महाभिषेक समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री शशिकांत खुणे, श्री गुंडोपंत जोशी श्री धर्मराज सूर्यवंशी श्री अमोल पवार श्री अच्युत थोरात मेजर श्री धनंजय साळुंके एडवोकेट संजय शिंदे श्री हरिश्चंद्र आगळे श्री हनुमंत तांबे सर श्री दत्ता साळुंके यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. शिवरायांचा पुतळा परिसर फुलांनी सजविण्यात आला होता तसेच वाद्यांच्या दणदणाटात व फटाक्यांच्या आतषबाजीने तसेच समितीच्या मावळ्यांच्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव चे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तसेच धाराशिव शहर तालुका परिसरातील आजी-माजी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते मावळे उपस्थित होते.

  • Related Posts

    ‘हरित धाराशिव’ची जय्यत तयारी ; सामाजिक वनीकरण विभागाकडून ३५ लाखांहून अधिक रोपांची निर्मितीजिल्हाधिकारी कीर्तीकुमार पूजार यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १५ जूनपासून शासकीय दरात रोपे उपलब्ध

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्याला अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘हरित धाराशिव अभियान २०२६’ ची तयारी अंतिम टप्प्यात…

    व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनांच्या रांगाच रांगा , महामार्गावर अपघात झाल्यास कोण जबाबदार

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : शहरा नजीक असलेल्या समाधान हॉटेल जवळील महानगर गॅस पंप यांच्या मिसाळ नियोजनाचा फटका बाहेरगावच्या भाविकांना बसण्याची शक्यता असून भाविकांच्या वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *