कम्युनिटि पोलीसींग अंतर्गत तामलवाडी पोलीसांची शाळेस भेट

Spread the love

तुळजापूर – मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली कम्युनिटि पोलीसींग स्कीम अंतर्गत तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर, महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक- अमृता पटाईत,पोलीस उप निरीक्षक जाकिर पटेल, पोलीस हावलदार- तेलप, पवार तसेच महिला पोलीस हावलदार- सोनाली जाधव, महिला पोलीस नाईक रोहिणी धुमाळ, पिंक पथक बीट अंमलदार संजय राठोड , वैशाली कोरे, आकाश सुरनर यांचेसह पोलीस पथकाने आज दि.08 नोव्हेंबर रोजी 09.30 ते 10.40 वा. सु. सरस्वती विद्यालय तामलवाडी येथे भेट दिली. त्यावेळी शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींना पोलीसांविषयी समज-गैरसमज, वाहतुकीचे नियम, बाललैंगिक अत्याचार, भारतीय न्याय संहिता व पोक्सो अधिनियमातील बालकांचे सुरक्षे संबधित असेलेल्या कलमाबाबत, व्यसनमुक्ती, गुड टच-बॅड टच, डायल 112, 1098, सायबर गुन्हे, सायबर आवरनेस तसेच सोशल मिडियां विषयांच्या गुन्हा संदर्भात मोलाचे मार्गदर्शन व समुपदेशन केले. तसेच शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या. सदर भेटी दरम्यान शाळेचे सरस्वती विद्यालय शाळेचे 925 विद्यार्थी, मुख्याध्यापक वडणे, शिक्षक वृंद, कर्मचारी माजी सरपंच दत्ता वडणे तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थितीत होते.

  • Related Posts

    रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – देशातील रोजगार,बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्राच्या आर्थिक स्थितीबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic…

    १ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक ;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज/मुंबई विशेष वृत्तसेवा:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *