बार्शीची आत्मजा घोडके पश्चिम विभागीय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र

Spread the love

बार्शी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून आत्मजा घोडके हिने पश्चिम विभागीय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता मिळवून सोलापूर विद्यापीठाचे नाव उज्ज्वल केले आहे. साम ग्लोबल विद्यापीठ, भोपाळ, मध्य प्रदेश येथे 1 ते 5 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेमध्ये आत्मजा घोडके बी.पी. सुलाखे महाविद्यालयाच्या वतीने सहभागी झाली आहे.

आत्मजा घोडके ही बी.सी.ए. भाग 3 ची विद्यार्थीनी असून, तिच्या कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव, आणि आत्मविश्वासामुळे तिला ही संधी प्राप्त झाली आहे. शारीरिक शिक्षण संचालक डॉ. दत्तप्रसाद सोनटक्के यांनी तिला मार्गदर्शन केले आणि सराव शिबिरात तिला पुढील तयारीसाठी घडवले.

श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे, अरुणजी देबडवार आणि इतर सर्व संस्था सदस्यांनी आत्मजाचे अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

ही निवड सोलापूर विद्यापीठासाठी अभिमानाची बाब असून, आत्मजाला शुभेच्छा आहे की ती राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करेल आणि विद्यापीठाचे नाव उंचावेल.

  • Related Posts

    ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा; रुपामाता फाऊंडेशनचे सचिव अँड. अजित गुंड पाटील यांचीमागणी( पावसाळ्यापुर्वी वीज यंत्रणा मजबूत करण्याची मागणी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील ढोकी व परिसरातील गावांमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, ढोकी येथील ३३ केव्ही सब-स्टेशनची क्षमता वाढवावी तसेच परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण…

    तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा ; तीर्थ बुद्रुक गावात विकासाचा थेट संवाद

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हा प्रशासनाचा प्रमुख गावात मुक्कामी राहून थेट गावपातळीवर लोकांशी संवाद साधत असेल,तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मोठी मदत होते, याचा प्रत्यय तुळजापूर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *