
सोलापूर प्रतिनिधी – मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवसंजीवनी देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे बुधवार, ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सोलापूरच्या सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात दाखल होणार आहेत. या दौऱ्यात जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांशी थेट संवाद साधून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.
डाक बंगला येथे दिवसभर बैठका आयोजित करण्यात आल्या असून, या बैठकीत सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांशी मनोज जरांगे पाटील चर्चा करणार आहेत. आंदोलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांनाही या बैठकीत मार्गदर्शन मिळणार आहे.
जरांगे पाटील समाजबांधवांकडून येणाऱ्या सूचना व अपेक्षांवर लक्ष केंद्रित करून, सर्वसमावेशक विचारविनिमयानंतर आंदोलनाच्या पुढील टप्प्याची घोषणा करतील.
सकल मराठा समाज – सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने सर्व मराठा बांधवांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या महत्त्वाच्या बैठकीस उपस्थित राहून आपला सक्रीय सहभाग नोंदवावा व आरक्षणाच्या लढ्याला अधिक बळ द्यावे.