शिवसेना जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांच्या पुढाकाराने ढोकी आणि परिसरातील बांधकाम कामगारांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

धाराशिव – आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे (१ मे) औचित्य साधून, शिवसेना जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांच्या पुढाकाराने ढोकी आणि परिसरातील बांधकाम कामगारांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ५१ बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करून सन्मानित करण्यात आले.

श्री. साळुंके यांच्या हस्ते उपस्थित कामगारांना संसार उपयोगी भांडी व इतर आवश्यक वस्तू, त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती प्रमाणपत्रे आणि मोफत आरोग्य तपासणी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कामगारांच्या योगदानाला सन्मानित करण्याचा आणि त्यांना आवश्यक मदत पुरवण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख मायाताई चव्हाण, ढोकी ग्रामपंचायत सदस्या विमल डोलारे, शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने बांधकाम कामगार बंधू-भगिनी उपस्थित होते. या उपक्रमामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *