विधानपरिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी श्री आई तुळजाभवानी मातेची अभिषेक पूजा करून विकास आराखड्याबाबत केली चर्चा

Spread the love

तुळजापूर -: विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आज त्यांच्या धाराशिव दौऱ्यादरम्यान श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन अभिषेक पूजा केली. यावेळी त्यांनी परिसरात चालू असलेल्या कामांची पाहणी करून प्रशासकीय इमारतीमध्ये बैठक घेतली.
मंदिर संस्थान येथे झालेल्या बैठकीत मा उपसभापती महोदयांनी प्रस्तावित विकास आराखड्याबाबत सादरीकरण पाहून इत्यंभूत माहिती घेऊन प्रशासनास सूचना दिल्या. कामे करताना येणाऱ्या अडचणींबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
विकास आराखड्याची सद्यस्थिती व उच्चाधिकार समितीच्या सुचनांबाबत माहिती घेतानाच आराखड्या बाबत स्थानिक नागरिकांच्या मतांविषयी जाणून घेतले. आपत्ती व्यवस्थापनाबाबत नियोजन करताना न्यायमुर्ती राजन कोचर समितीचा अहवाल विचारात घ्यावा, दिव्यांग व वृद्धांसाठी विशेष सुविधा तयार करण्याबाबत सूचना दिल्या, सोलर प्लांट उभारताना तेथे वनीकरण व उद्यान तयार करणेबाबत अर्बन फॉरेस्ट चे उदाहरण देऊन सूचना दिल्या. पुणे विद्यापीठामध्ये चालू असलेल्या मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रमाबाबत माहिती देऊन मंदिर कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण देण्याबाबत सुचवले.
मंदिर व्यवस्थापनाने प्रसाद व्यवस्था, भक्तनिवास, भाविक सुविधा केंद्र, आरोग्य व्यवस्था, पायी चालत येणाऱ्या भाविकांची व्यवस्था, भाविकांसाठी कुळाचारासाठी सुविधा इत्यादी बाबत मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली.
यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड यांनी मा उपसभापती यांचा महावस्त्रे व देवीजींची प्रतिमा देऊन सत्कार केला. बैठकीस धारशिवचे अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव, उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले, उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड, तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, तुळजापूरचे तहसीलदार तथा मंदिर संस्थान चे व्यवस्थापक अरविंद बोळंगे उपस्थित होते. वास्तुविशारद हेमंत पाटील आणि तेजस्विनी आफळे यांनी बैठकीस ऑनलाइन माध्यमाद्वारे उपस्थित राहून माहिती दिली.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *