भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्रात सेवापूर्ती सोहळा संपन्न ….

Spread the love

धाराशिव – नेहरु युवा केंद्र धाराशिव कार्यालय जिल्हा युवा अधिकारी तथा महाराष्ट्र उपसंचालक मा.श्री धनंजय काळे साहेब व नेहरू युवा केंद्र धाराशिव चे लेखाधिकारी मा.श्री विकास कुलकर्णी साहेब यांचा सेवापूर्ती निमित्त सपत्नीक सत्कार सोहळा धाराशिव च्या कार्यालयात संपन्न झाला .

या सेवापूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वाशी नगर पंचायत चे नगराध्यक्ष सुरेश बप्पा कवडे , सोलापूर नेहरु युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार साहेब , मराठवाडा सिनेट सदस्य देवीदास पाठक साहेब तसेच जिल्ह्य़ातील आजी माजी स्वयंसेवक, पत्रकार बांधव , सामाजिक संस्थेचे सदस्य , बचत गट राजकीय महिला पुरुष पदाधिकाऱ्यांसह नेहरु युवा केंद्रातील मंडळाचे सदस्य आदी उपस्थित होते .

या सेवापूर्ती सोहळ्यात ,मराठवाडा सिनेट सदस्य देवीदास पाठक साहेब , सोलापूर जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार साहेब , स्वयंसेवक रुपेश उमरदंड ,प्रदीप साठे , पुरुषोत्तम बेले , रामेश्वर चोबे ज्ञानेश्वर भोसले ,मंगेश पगारे सर सौ.मीनाताई सोमाजी , प्रशांत मते ,सौ.नंदाताई पूनगुडे , आदिनी आपले मनोगत व्यक्त केले ,तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी रविकांत सुरवसे , वैभव लांडगे , श्याम वाघमारे , प्रशांत मते यांनी परिश्रम घेतले

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप साठे यांनी केले तर आभार पुरुषोत्तम बेले यांनी मानले.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *