जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी केली धान्य गोदाम,स्वस्त धान्य दुकान व शिवभोजन केंद्राची पाहणी

Spread the love

धाराशिव – (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी.किर्ती किरण पुजार यांनी आज धाराशिव येथील शासकीय धान्य गोदामाची पाहणी केली.यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती स्वाती शेंडे, तहसीलदार श्रीमती मृणाल जाधव आणि पुरवठा निरीक्षक श्री.अमोल बाहेकर उपस्थित होते.पाहणी दरम्यान,गोदामातील दप्तर व धान्याची तपासणी करण्यात आली.थप्पीनिहाय धान्य मोजणी करून त्याची गुणवत्ता तपासण्यात आली.तसेच गोदामपाल यांना स्वच्छतेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी धाराशिव येथील स्वस्त धान्य दुकान क्र.०१ (संचालक – सुशीलकुमार अजमेरा) यांची पाहणी केली.ई-पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या धान्याच्या वितरणाची तसेच ई-केवायसी प्रक्रियेची तपासणी करण्यात आली.३१ मार्चपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांचे १०० ई-केवायसी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी धान्याच्या नमुन्यांची तपासणी तसेच लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यानंतर,जिल्हाधिकाऱ्यांनी शिवभोजन केंद्र (सिद्धांत हॉटेल – हॉटेल तुळजाई,जिल्हा रुग्णालयासमोर, धाराशिव) येथे भेट देऊन अन्नाच्या गुणवत्तेची आणि वितरण प्रक्रियेची पाहणी केली.गरजू व गरीब लाभार्थ्यांना शासनाच्या निर्णयानुसार स्वस्त दरात भोजन मिळते का,याची खातरजमा केली.तसेच शिवभोजन केंद्राचा परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना दिल्या.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *