२२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत, लोकअदालतीत प्रलंबित खटले तडजोडीने मिटवावेत

Spread the love

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांचे आवाहन

धाराशिव – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,दिल्ली आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.२२ मार्च रोजी शनिवारी सकाळी १० वाजता जिल्हा न्यायालय,धाराशिव आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये ही लोकअदालत भरविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील न्यायालयीन प्रलंबित तसेच वादपूर्व प्रकरणांमध्ये तडजोडीच्या माध्यमातून जलद न्यायनिर्णय व्हावा,या उद्देशाने लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये दिवाणी प्रकरणे,तडजोडपात्र फौजदारी खटले, मोटार अपघात प्रकरणे,कौटुंबिक वाद, धनादेशाशी संबंधित प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग येथील तडजोडीस पात्र प्रकरणांचा सामावेश असेल.

लोकअदालतीत समेटाद्वारे प्रकरणे निकाली काढण्यात येतात.न्यायालयीन लढ्याचा खर्च,वेळ व त्रास टाळण्यासाठी पक्षकारांनी लोकअदालतीत आपल्या प्रकरणांचा निपटारा करून न्यायाचा जलद लाभ घ्यावा,संबंधित पक्षकारांनी आपल्या वकिलांशी संपर्क साधून राष्ट्रीय लोकअदालतीत सामोपचाराने तडजोड करण्यासाठी पुढे यावे आणि या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एस.सी.खटी आणि वरिष्ठ न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव वसंत यादव यांनी केले आहे.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *