तुळजापूर – कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट व एच. डी. एफ. सी. बँकेच्या अर्थ सहयोगातून 2020 पासून तुळजापूरातील 22 गावात सर्वागीण ग्रामीण विकास कार्यक्रम हा ग्रामिण विकासातील बहुआयामी प्रकल्प चालवला जात आहे. महिला सबलीकरणासाठी संस्थेकडून मागील पाच वर्षात हजारो महिला परिवारांना आर्थिक आणि सामिजिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट व एच डी एफ सी बँक यांच्या संयुक्त विद्यमानातून मार्च जागतिक महिला दिवस साजरी करत असते. या वर्षी महिला सध्य स्थिती गती आणि प्रगती या आशयावर जवळगा मेसाई गावात निर्माण करण्यात आलेल्या तुळजाई महिला शेळी आणि कोंबडी उत्पादक कंपनीच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी नव्याने रूजू झालेले धाराशिव जिल्हय़ाचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक मा. शफकत आमना, राष्ट्रीय दर्जाच्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्षा अनिता माळगे व टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे सामाज कार्य अधिकारी गणेश चादरे, धाराशिव जिल्हा आर एफ ओ मा. देशपांडे साहेब आणि प्रकल्प व्यवस्थापक डाॅ. दयानंद वाघमारे उपस्थित होते. कंपनी कार्यस्थळावर महिला रोजगारासाठी तयार करण्यात आलेल्या नर्सरी युनिटचे उद्घाटन अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या हस्ते करण्यात आले. कंपनी कार्यस्थळावरील वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आले. सुरूवातीला समाजातील गरीब महिलांना लघुउद्योगासाठी धनादेश वाटप करण्यात आले. आलेल्या महिला प्रमुख पाहुणे श्रीमती शफकत आमना, श्रीमती. अनिता माळगे यांना कोहिजन कडून दरवर्षी दिले जाणारे महिला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व उत्कृष्ट काम करणा-या अधिकारी स्नेहल पाटील, तुळजाई महिला कंपनीच्या अध्यक्षा गंगा नन्नवरे, एकल महिला संघटनेच्या अध्यक्षा पार्वती भगत यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमात आपल्या भाषणात पोलीस अधिकारी शपकत आमना यांनी आपल्या कृषक परिवाराची पार्श्वभूमी सांगत त्यांनी समाजातील अनेक बंधनाशी सामना करत अधिकारी बनण्याचा प्रवास सांगितला. महिलांनी शिक्षण उद्योग आणि संघटन यातून समृध्द जीवन जगू शकता असे प्रतिपादन केले. मा. गणेश चादरे यांनी महिला सबलीकरणात कौटुंबिक स्वास्थ्य किती महत्वाचे आहे हे सांगत असताना मोबाईलमुळे नात्यात वाढत जाणा-या दुराव्या विषयी चिंता व्यक्त केले. आपल्या भाषणात यशस्वीनी अग्रो प्रोड्युसर कंपनीच्या चेअरमन अनिता माळगी यांनी उत्पादक कंपनी सुरूवातीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रवास सांगितला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी शेतकरी कंपनी विषयी त्यांच्याशी केलेला संभाषणाची कहाणी सांगितले. आंतरराष्ट्रीय जी 20 या कार्यक्रमात अनिता माळगे यांना कसा सन्मान मिळाला या विषयावर त्यांनी आपल्या भाषणाची गुंफण करून उपस्थित महिलांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. मनोहर दावणे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार ज्ञानेश्वर बनसोडे यानी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी तुळजापूर तालुक्यातील 22 गावातून महिला उपस्थित होत्या व कोहिजनचे अभियंता दिनेश भोसले, रोहित चव्हाण, प्रदीप कांबळे, जीवन मिसाळ ई उपस्थित होते.
