किर्ती किरण पूजार धाराशिवचे नवे जिल्हाधिकारी!

Spread the love

धाराशिवचे नूतन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांची नियुक्ती झाली असून पुजार यांनी यापूर्वी (भा. प्र. से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी या ठिकाणी कामकाज पाहिले आहे.

धाराशिव – राज्य शासनाने किर्ती किरण एच. पुजार यांची धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केली आहे. यापूर्वी ते रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून कार्यरत होते.

मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून, किर्ती किरण एच. पुजार यांनी तत्काळ नवीन पदाचा कार्यभार स्वीकारावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या सल्ल्यानुसार इतर अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत.

प्रशासनातील एक सक्षम आणि अनुभवी अधिकारी म्हणून किर्ती किरण एच. पुजार यांची ओळख आहे. रत्नागिरी जिल्ह्यात त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामे आणि प्रशासकीय सुधारणा करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या अनुभवाचा लाभ आता धाराशिव जिल्ह्याच्या प्रशासनाला मिळणार आहे.

  • Related Posts

    पॉश कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षमता बांधणी कार्यक्रम

    Spread the love

    Spread the loveपुणे, दि. ९ एप्रिल २०२६ — महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रशिक्षण प्रबोधिनी (यशदा) यांच्या संयुक्त विद्यमाने “कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई, निवारण)…

    मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमजिल्ह्याची ऐतिहासिक झेप : १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्हा उद्योग केंद्राने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या महत्त्वाकांक्षी योजनेत १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *