पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली श्री तुळजाभवानी देवीची अभिषेक महापूजा

Spread the love

धाराशिव  (प्रतिनिधी) – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज २० फेब्रुवारी रोजी सकाळी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीजींची सहकुटुंब अभिषेक महापूजा करून देवीजींचा आशीर्वाद घेतला.पालकमंत्री सरनाईक हे जिल्हा दौऱ्यावर असून,या दौऱ्यादरम्यान त्यांनी मंदिराच्या विविध विकासकामांची पाहणी केली.

अभिषेक महापूजेनंतर पालकमंत्र्यांनी मंदिर परिसर आणि सध्या सुरू असलेल्या विकास आराखड्याच्या कामांचा आढावा घेतला.तसेच,मंदिर पुजाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचनाही जाणून घेतल्या.यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक संजय जाधव व पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक श्रीमती जया वाहने उपस्थित होत्या.

  • Related Posts

    सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणावर प्रशासन करणार कारवाईहोर्डिंग्ज,बॅनर्ससाठी पूर्वपरवानगी बंधनकारक ; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.निवडणूक कालावधीत होर्डिंग्ज,बॅनर्स,पोस्टर्स…

    सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज

    Spread the love

    Spread the loveसोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन आणि IPS वृष्टी जैन यांच्याकडे जिल्ह्याची धुरा!सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *