जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Spread the love

धाराशिव  – ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज २६ जानेवारी रोजी सकाळी ८.१० वाजता जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत झाले.त्यानंतर जिल्हाधिकारी श्री.ओंबासे यांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी कुष्ठरोग प्रतिज्ञा व घोषणापत्राचे वाचन करून उपस्थितांना राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची शपथ दिली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,उपजिल्हाधिकारी संतोष भोर,संतोष राऊत,उदयसिंह भोसले,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा नियोजन अधिकारी अर्जून झाडे,तहसीलदार अभिजीत जगताप यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील, धाराशिव तहसील कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *