जिल्हयातील १४६४ कर्मचा-यांचे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (सीपीएचसी) प्रशिक्षण पूर्ण

Spread the love

धाराशिव – ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घराजवळच गुणवत्तापुर्ण व सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या उददेशाने सार्वजनिक आरोग्य मंत्री मा प्रकाशजी आबिटकर यांच्या संकल्पना व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार धाराशिव जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ अर्चना पाटील व उपाध्यक्षा सौ उषाताई रविंद्र गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले.

तसेच जिल्हा परिषद धाराशिव च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रियवंदा महाडदळकर यांचे सुचनेनुसार व डॉ. सतीश हरिदास जिल्हा आरोग्य अधिकारी व डॉ धनजंय चाकुरकर जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मार्गदशनाखाली सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. हे शिबीर यशस्वी व गुणवत्तापुर्ण पार पाडणेकरिता सीपीएचसी नोडल अधिकारी डॉ. विनयशील कुलकर्णी यांच्या नियत्रंणाखाली आजतागायत धाराशिव जिल्हयातील आठ तालुक्यांपैकी धारशिव, कळंब, भुम, परंडा, वाशी व लोहारा या तालुक्यातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र येथील एकूण १ हजार ४६४ अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांना यशस्वी व प्रभावीपणे प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशिक्षण संघ धाराशिव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शिनगारे यांनी दिली. या विशेष प्रशिक्षणामध्ये जिल्हयातील विविध संवर्गातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून आपले प्रशिक्षण पूर्ण केले. यामध्ये प्रा आ केंद्रातील ५७ वैद्यकीय अधिकारी, ९४ समुदाय आरोग्य अधिकारी, ४९ आरोग्य सहाय्यक, ३० आरोग्य सहाय्यीका, ३२ स्टाफ नर्स, १३८ आरोग्य सेविका, १५९ आरोग्य सेवक, ४२ गट प्रवर्तक, ८५६ आशा स्वयंसेविका आणि ७ इतर कर्मचारी यांचा समावेश आहे.

या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरादरम्यान आरोग्य कर्मचा-यांना मार्गदर्शन करण्यासाठी व प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी जिल्हयातील स्त्रीरोग तज्ञ डॉ.आय के मुल्ला, डॉ संजय नलावडे, डॉ सुजित नायकल, डॉ. वैशाली चाकोते तसेच बालरोग तज्ञ डॉ. श्रीधर जाधव, डॉ. अक्षय देशमुख व आपतकालीन वैद्यकीय सेवा या करिता भिषक डॉ. प्रशांत रेवडकर, डॉ. दिपक निंभोरकर , सामान्य व किरकोळ आजारांबाबत माहिती देणेकरिता डॉ. अमोल शिनगारे, डॉ. पी. डी. धनके , असंसर्गजन्य आजारांबाबत माहिती देणेकरिता डॉ. विक्रांत राठोर, डॉ. अमोल पांढरे, मानसिक आजारांची छाननी व व्यवस्थापन या विषयांकरिता मनोविकार चिकित्सक सुहास शिंदे व समाजसेवक बलराम पोतदार, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व संसर्गजन्य आजारांच्या व्यवस्थपनाकरिता संजय शिंदे व निळकंठ मोरे, कुटुंब कल्याण विषयांकरिता व्ही पी बुटे व सुनिता जाधव आणि वृध्दपकाळातील वेदनाशामक सेवा या विषयांकरिता मंजुश्री सुरवसे व सुवर्णा सुरवसे यांनी विविध सत्रांमध्ये मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या दोन दिवसीय सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण तथा शिबिरांमुळे जिल्हयातील आरोग्य वर्धिनी प्रा आ केंद्र व उपकेंद्र यांना राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके (NQAS) याबाबत मानांकने मिळवणेकरिता भरपुर प्रमाणात उपयोग झाला. तसेच या प्रशिक्षणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत होऊन ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्व आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे .

  • Related Posts

    पत्रकार मारहाण, धक्काबुक्की प्रकरणी कारवाईची मागणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  (प्रतिनिधी) – तालुक्यातील येडशी टोलनाक्याजवळ शेतकरी आंदोलनाचे वार्तांकन करीत असलेल्या पत्रकारांना पोलिसांकडून झालेल्या मारहाण व धक्काबुक्की प्रकरणी पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी…

    सर्वोच्च न्यायालयाची रु. ३२७ कोटींच्या २०२१ विमा प्रकरणी कंपनीला नोटीस!

    Spread the love

    Spread the love२ लाख २७ हजार शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रश्न ऐरणीवर; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा धाराशिव – जिल्ह्यातील २ लाख २७ हजार शेतकरी बांधवांच्या ३२७ कोटी रुपयांच्या खरीप २०२१…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *