नेहरू युवा केंद्र सोलापूर व क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन

Spread the love

सोलापूर (बार्शी) : भारत सरकार द्वारा, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत, नेहरू युवा केंद्र, सोलापूर व क्रांती बहुद्देशीय संस्था, बेलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद व राजामाता मॉंसाहेब जिजाऊ यांच्या जयंती ( राष्ट्रीय युवा सप्ताह ) निमित्त खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन संतोष गुळमिरे प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर, बार्शी या ठिकाणी करण्यात आले आहे.

युवा वर्गामध्ये जनजागृती होण्यासाठी तसेच युवक व युवतींच्या कौशल्य गुणांना वाव देऊन प्रोत्साहन मिळण्यासाठी अश्याप्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे नेहरू युवा केंद्र, सोलापूरचे युवा जिल्हाधिकारी अजितकुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या स्पर्धा खुल्या गटात होणार असून, स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम क्रमांक – रोख रक्कम 501 रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, द्वितीय क्रमांक – रोख रक्कम 301 रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, तृतीय क्रमांक – रोख रक्कम 201 रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, उत्तेजनार्थ – रोख रक्कम 101 रुपये, व सन्मानपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

तरी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी स्पर्धा आयोजक धिरज शेळके यांच्या 9922914009 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • Related Posts

    धाराशिवच्या वैभवात भर! , शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय , सहा मजले, १६ कोर्ट आणि प्रशस्त सभागृहाचा समावेश : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव -: आपल्या धाराशिवचा कायापालट होत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या धाराशिव शहराच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. जिल्ह्याच्या वाढत्या विस्ताराचा आणि नागरिकांच्या सोयीसुविधांचा विचार…

    शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शिबीराचे यशस्वी आयोजन करा

    Spread the love

    Spread the loveजिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार धाराशिव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या वतीने आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरात प्रत्येक विभागाने आपल्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती देणारे बॅनर्स,फ्लेक्स,पॅम्प्लेट्स आदींसह स्वतंत्र स्टॉल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *