संस्थापक- अॅड. व्यंकटराव गुंड पाटील…
(अर्बन व मल्टीस्टेटची २३ वी व १५ वी संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न)

धाराशिव ( प्रतिनिधी ) – रुपामाता अर्बन व मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., धाराशिव यांच्या २३ वी व १५ वी संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा “नातं… व्यवसायापलीकडचं..!” या ब्रीदवाक्याला साजेशा खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली.
सभेत दोन्ही संस्थांच्या सभासदांना ११ टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली.
सभेस रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक व कुटुंबप्रमुख अॅड.व्यंकटराव गुंड पाटील, मार्गदर्शक तथा चेअरमन सुधाकर गुंड गुरूजी, जिल्हा सहकार बोर्डाचे अधिकारी मधुकर जाधव, संचालक अॅड. अजित गुंड पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
रुपामाता अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण बोधले तसेच मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर यांनी दोन्ही संस्थांचा वार्षिक अहवाल वाचन केला. संस्थेच्या आर्थिक वाटचालीचा, व्यवसायवृद्धीचा, सभासदाभिमुख उपक्रमांचा तसेच आगामी योजनांचा आढावा सभेसमोर मांडण्यात आला. सभासदांच्या विश्वासामुळे संस्थांनी विविध क्षेत्रांत सातत्याने प्रगती केली असून, भविष्यातही सभासदांना अधिकाधिक सक्षम व दर्जेदार आर्थिक सेवा देण्याचा संस्थेचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी रुपामाता अर्बनचे संचालक शंकर गाडे, पांडुरंग लोमटे, संदीपान गुंड, सौ.गंगुबाई चौधरी, श्रीमती रुक्मिणी पवार, सहदेव ढाकरे यांची उपस्थिती होती. तसेच रुपामाता मल्टीस्टेटच्या व्हाईस चेअरमन सौ. महानंदा मल्हारी माने, संचालक डॉ. श्री. सतीश जेवे, रामदास गुंड, तज्ज्ञ संचालक बाबुराव पुजारी, तसेच मनोहर सूर्यवंशी, मुक्ताबाई राजगुरू, श्रीमती त्रिवेणाबाई गरड, सौ. सुमन सावंत यांच्यासह मुख्य प्रशासकीय अधिकारी विशाल गुंड पाटील व अन्य पदाधिकारी संचालक मंडळातील अन्य सदस्य उपस्थित होते.
सभेदरम्यान सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक व कर्मचारी यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेच्या पारदर्शक कारभारासोबतच सभासदांशी असलेले विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला.
संस्थापक अॅड. व्यंकटराव गुंड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रुपामाता अर्बन व मल्टीस्टेटने सहकार क्षेत्रात निर्माण केलेला विश्वास, सभासदांचा वाढता सहभाग आणि संस्थेची सातत्यपूर्ण आर्थिक वाटचाल यामुळे दोन्ही संस्थांच्या पुढील प्रगतीचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक व कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागामुळे सभा यशस्वी झाली.