Spread the love

विधिज्ञांनी जबाबदारी व प्रामाणिकपणे कर्तव्य बजावावे
न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे

धाराशिव – जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाच्या तुळजापूर येथील न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन आज रविवारी ६ सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांच्या हस्ते आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश अभीश्री देव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाले.यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश खोमणे, महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.मिलिंद थोबरे, तुळजापूर विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.जयवंत इंगळे यांच्यासह न्यायव्यवस्थेतील मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी न्यायमूर्ती ब्रह्मे म्हणाले की,पक्षकार आणि वकिलांसाठी न्यायालयात आवश्यक त्या सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या सुविधांचा सर्वांनी योग्य पद्धतीने लाभ घ्यावा.विधिज्ञांनी न्यायालयीन कामकाज करताना आपली जबाबदारी आणि प्रामाणिकपणा जपत कर्तव्य पार पाडावे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश अभीश्री देव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मिलिंद थोबरे यांनी तुळजापूर बार असोसिएशनचे विशेष कौतुक केले.अवघ्या २० किलोमीटरच्या परिसरात अशा प्रकारचे न्यायालय उपलब्ध करून घेण्यासाठी बार असोसिएशनने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी अभिनंदन केले.‘‘जनतेचा सध्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.हा विश्वास कायम टिकवून ठेवण्याची जबाबदारी न्यायाधीशांसोबतच वकिलांचीही आहे.त्यामुळे प्रत्येक विधिज्ञाने आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे,असे आवाहन ॲड.थोबरे यांनी केले.

प्रास्ताविकात ॲड.जयवंत इंगळे यांनी तुळजापूरला अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालय मिळवून देण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच,यासाठी विशेष प्रयत्न करणारे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांच्यासह संबंधित सर्वांचे त्यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य न्यायदंडाधिकारी प्रज्ञा मेढे यांनी केले,तर अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश खोमणे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बार असोसिएशनच्या पदाधिकारी ॲड. अंजली साबळे,सचिव शैलेश पाठक,सहसचिव ॲड. फुटाणकर,कोषाध्यक्ष ॲड. सपकाळ यांच्यासह पदाधिकारी, सदस्य आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.तानाजी जगताप,गिरीश शेटे,एन. कदम, बालाजी देशमाने,तानाजी तांबे, जगदीश कुलकर्णी,नागनाथ कानडे,संजय पवार,संगीता कोळेकर,स्वाती नळेगावकर, प्रशांत कोळेकर,हिरोळीकर यांच्यासह जिल्ह्यातील न्यायाधीश, बार असोसिएशनचे पदाधिकारी, विधिज्ञ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित