
धाराशिव : शहरातील अंबाला हॉटेलच्या बाजूला संभाजी महाराज चौक परिसरात हिराई कन्स्ट्रक्शनचे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन सामाजिक चळवळीतील युवराज राजे निंबाळकर व नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.यावेळी सुरक्षा समिती सदस्य अब्दुल लतीफ तसेच ज्येष्ठ नागरिक अंकुश उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यालयाचे संचालक विष्णु किसन घरबुडवे यांच्यासह किसन घरबुडवे,उत्तम घरबुडवे,विशाल घरबुडवे,कल्पना घरबुडवे,अरुणा घरबुडवे,कुसुम वाघमारे,महानंदा गजधने,साधना वाघमारे,वर्षा गजधने,विद्या गायकवाड, रेश्मा घरबुडवे,आम्रपाली सोलापुरे,अनिता

बनसोडे, शुभांगी बनसोडे,मिनाक्षी बनसोडे आणि घरबुडवे परिवारातील सदस्य उपस्थित होते.उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विष्णु किसन घरबुडवे यांना नवीन व्यवसायाच्या शुभारंभाबद्दल मनपुर्वक शुभेच्छा देत हिराई कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून व्यवसायात मोठी भरारी घ्यावी,अशा सदिच्छा व्यक्त केल्या.यावेळी गणेश वाघमारे,संजय गजधने,महेबुब खान,जजरथ सोलापूरे,राजेंद्र धावारे,आसेफखान पठाण,सोन्या सोलापुरे,शेख रौफ,बाबासाहेब गुळीग,प्रविण जगताप,सचिन दिलपाक,सरफराज पटेल,ॲड.जावेद काझी,मिलिंद चव्हाण,भैय्या नन्नवरे,आप्पा सिरसाठे,शशी माने,मिलिंद पेठे,शिवलिंग लोंढे,स्वराज जानराव,अजय चिलवंत,नंदकिशोर वाघमारे,दादा पाटील,आयुष,अनुष, निखिल,अनोखी परी,संबोधी,विहास,विहान,रियांश, यांच्यासह मित्रपरिवार,हितचिंतक व नागरिक उपस्थित होते.सुत्रसंचलन उत्तम घरबुडवे यांनी केले तर किसन घरबुडवे यानी आभार मानले.विष्णु घरबुडवे यांनी नवीन कार्यालयाच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रातील ग्राहकांना आवश्यक बांधकाम साहित्य व सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.