धाराशिव – जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी व ३० विधीज्ञ यांचेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,धाराशिव च्यावतीने ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता जिल्हा व सत्र न्यायालय येथे मध्यस्थी जागृती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.टी.खटी हे असतील.या प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रशिक्षक म्हणून निलंगा येथील जिल्हा न्यायाधीश एस.टी.भालेराव आणि वडगाव पुणे येथील जिल्हा न्यायाधीश जे.एल.गांधी हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धाराशिव यांनी दिली.