पत्रकाराची बदनामी केल्याप्रकरणी एकावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Spread the love

संगमनेर – राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघातात निधनानंतर  सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या  विकृत माजी शहर प्रमुख दिनेश फटांगरे याने स्व. अजितदादांवर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली. आरोपी एव्हढ्यावरच थांबला नाही तर त्याने या घटनेची बातमी दैनिक युवावार्ताने प्रकाशित केल्याचा राग धरून त्याच्या फेसबुक पेजवर संपादक किसन भाऊ हासे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अश्लील पोस्ट केली. त्यामुळे वर्तमानपत्र व संपादकांची बदनामी करून धमकी दिल्याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत व बीएनएस नुसार दिनेश फटांगरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्रकारांना धमकी देणे व बदनामी केल्याप्रकरणी संगमनेर शहरात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती व प्रसारमाध्यम संस्था अधिनियम 2017 कलम 4 (पत्रकार संरक्षण कायदा), तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 351, 352, 353(1), 356(1) अन्वये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्व. अजितदादांविषयी घडलेल्या घटनेची बातमी दैनिक युवावार्ताने प्रकाशित केली. त्या बातमीवर फटांगरे याने कमेंट करत अतिशय खालच्या पातळीवर टीका केली. त्याचबरोबर त्याच्या फेसबुक पेजवर संपादक किसन भाऊ हासे यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची अश्लील टीका करणारी पोस्ट केली. याअगोदरही त्याने धमकीवजा अनेक अपमानास्पद पोस्ट केलेल्या आहेत. या सर्व कृत्य त्याने केवळ बातमीतून दुखावल्याने केले आहे, त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असतात. सरकार-समाजामध्ये चाललेल्या वेगवेगळ्या घटनांचा आढावा घेणे, अन्यायाविरूध्द ठोस भूमिका मांडणे ही वर्तमानपत्राची भूमिका असते. युवावार्ताने वेळोवेळी हीच भूमिका मांडली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगाला सामोरेदेखील गेलो आहे. परंतू यावेळी मात्र या विकृत इसमाने अतिशय खालची पातळी गाठत केवळ एका वर्तमानपत्राचीच नाही तर संपूर्ण प्रसारमाध्यमांची बदनामी केली आहे. या इसमावर कडक कारवाई झाल्यास समाजाला तो वेगळा संदेश असेल. त्यामुळेच आज सर्व पत्रकार, विविध संघटना यांनी या घटनेचा निषेध करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.  या विकृतीसमोर सलग ३ गुन्हे दाखल होऊनही तो पोलिसांच्या हाती लागत नाही हे दुर्देव आहे. पोलिसांनी तात्काळ या विकृत इसमाला गजाआड करून कठोर कायदेशीर कारवाई करावी. “
– फिर्यादी किसन भाऊ हासे .

  • Related Posts

    पत्रकारितेच्या सक्षमीकरणाचा निर्धार; व्हॉईस ऑफ मीडिया च्या राष्ट्रीय अधिवेशनाची उत्साहात सांगता

    Spread the love

    Spread the loveपत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर नवी दिल्ली : देशभरातील पत्रकारांना एकाच व्यासपीठावर आणणारे, पत्रकारितेच्या वर्तमान आणि भविष्यातील दिशेचा वेध…

    पत्रकारांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी; ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव | प्रतिनिधीपरंडा तालुक्यातील निजाम जवळा येथील शेतकरी बाबुशा सुपनास पवार यांच्या शेतातील शेड पाडण्यात आल्याची घटनेची वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार प्रभाकर लोंढे आणि कॅमेरामन अण्णाभाऊ लोंढे यांच्याविरोधात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *