व्हॉईस ऑफ मीडियातर्फे पत्रकार पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the love

नंदुरबार | प्रतिनिधी –

येथील व्हॉईस ऑफ मीडियातर्फे पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले.

शहरातील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला तोरणमाळ येथील गोरक्षनाथ मठाचे पिठाधीश संजूनाथ महाराज यांच्या हस्ते पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील होते. व्यासपीठावर नवनिर्वाचित नगरसेवक तथा पालिकेचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, व्हाईस ऑफ मीडियाचे सरचिटणीस राकेश कलाल, साप्ताहिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बडगुजर, पत्रकार महादू हिरणवाळे, राजू पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना संजुनाथ महाराज म्हणाले की, समाज मनाचे दर्पण असलेल्या पत्रकार बांधवांच्या पाल्यांनी
यशस्वी होण्याचे कार्य केले आहे. त्यांचा उचित सन्मान होणे गरजेचे आहे. अतिदुर्गम भागात जाण्यासाठी रस्ते नाही. त्यामुळे तेथील आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. यासाठी पत्रकारांनी पाठपुरावा करावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच तोरणमाळ आणि नर्मदा नदी येथे कॉरिडॉर प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
नगरसेवक हिरालाल चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील यांनी केले. त्यात त्यांनी व्हॉईस ऑफ मीडिया मार्फत पत्रकारांसाठी राबविल्या जाणाऱ्या कल्याणकारी उपक्रमाची माहिती दिली. यानंतर पत्रकारपाल्यांना शैक्षणिक किट वाटप करण्यात आली. दप्तर, वह्या, कंपास, पेन बॉक्स, वॉटर बॅग, पॅड, टिफीन आदी साहित्य या किटमध्ये समाविष्ट होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महादू हिरणवाळे यांनी केले. कार्यक्रमास नंदुरबार, तळोदा, शहादा, अक्कलकुवा येथील पत्रकार आणि त्यांचे पाल्य उपस्थित होते. व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष वैभव करवंदकर यांनी आभार मानले.

  • Related Posts

    पत्रकारितेच्या सक्षमीकरणाचा निर्धार; व्हॉईस ऑफ मीडिया च्या राष्ट्रीय अधिवेशनाची उत्साहात सांगता

    Spread the love

    Spread the loveपत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर नवी दिल्ली : देशभरातील पत्रकारांना एकाच व्यासपीठावर आणणारे, पत्रकारितेच्या वर्तमान आणि भविष्यातील दिशेचा वेध…

    पत्रकारांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी; ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव | प्रतिनिधीपरंडा तालुक्यातील निजाम जवळा येथील शेतकरी बाबुशा सुपनास पवार यांच्या शेतातील शेड पाडण्यात आल्याची घटनेची वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार प्रभाकर लोंढे आणि कॅमेरामन अण्णाभाऊ लोंढे यांच्याविरोधात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *