मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

Spread the love

धाराशिव –  “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांपैकी ज्यांचे वडील हयात नाहीत,पती हयात नाहीत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे,अशा सर्व पात्र महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ई-केवायसीनंतर पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकेकडे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत जमा करावयाची आहे.

ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करावयाची आहे.तसेच,या योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवरील ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक असल्यामुळे पोर्टलवर आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.त्यानुषंगाने जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांनी सदर वेब पोर्टलवर भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करावी.

ज्या पात्र लाभार्थी महिलांनी पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि पर्याय निवडताना काही चुका झाल्या आहेत,अशा लाभार्थ्यांसाठी एक अंतिम संधी (One Time Edit Option) उपलब्ध करून देण्यात आली आहे.ही संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर कोणताही बदल करण्याची सुविधा मिळणार नाही. त्यामुळे ई-केवायसीमध्ये सर्व माहिती अचूक भरावी,असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, धाराशिव यांनी केले आहे.

  • Related Posts

    90 लाखांचा स्वराज्य ध्वज, हरित धाराशिव अभियान – पालकमंत्री सरनाईकांचा दौरा

    Spread the love

    Spread the loveतुळजाभवानी नवरात्र, प्रशासकीय व हॉस्पिटल आढावा – खासदार ओमराजेंच्या घरी भेट धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे शनिवारी 15 ऑगस्ट…

    पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते १५ ऑगस्टला मुख्य शासकीय ध्वजारोहणभारतीय स्वातंत्र्य दिनाचा ८० वा स्वातंत्र्य दिन समारंभ

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ८० वा स्वातंत्र्य दिन समारंभ शनिवार,दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिवच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *