प्रमोद महाजन कौशल्य व उदयोजकता विकास अभियान मोफत प्रशिक्षण : लाभ घेण्याचे आवाहन

Spread the love

धाराशिव,दि.०१ – जिल्हयातील युवक-युवतींसाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन २०२४ -२५ अंतर्गत मोफत कौशल्य विकास कार्यक्रमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, टेलिकॉम,इलेक्ट्रॉनिक्स – सोलार टेक्नीशिअन,अॅप्रेल,मिडीया अॅन्ड एन्टरटेनमेंट,ब्युटी अॅन्ड वेलनेस,टुरिझम अॅन्ड हॉस्पीटॅलिटी या सेक्टरमधील कोर्सचे मोफत कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणासाठी वयाची अट १५ ते ४५ वर्षे आहे.उमेदवार हा धाराशिव जिल्हयाचा रहिवासी असावा.तसेच यापुर्वी कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेला नसावा.१५ ते ४५ वयोगटातील इच्छुक व पात्रताधारक कौशल्य प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या या गुगल फॉर्म लिंकच्या उमेदवारांनी https://forms.gle/l2TWxtA5hv3Eogy9 माध्यमातुन १० जानेवारी २०२५ पर्यंत आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी दुरध्वनी २४७२-२९९४३४ यावर संपर्क साधावा. असे आवाहन सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,प्रशासकीय इमारत, धाराशिव यांनी केले आहे.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *