दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी विशेष शिबीर — जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर तर्फे उपक्रम

Spread the love

सोलापूर  – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे सचिव प्रशांत पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली “दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी विशेष शिबीर” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हे शिबीर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, कर्णिक नगर, सोलापूर येथे पार पडले.

या विशेष उपक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि महिला व बाल विकास कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

शिबीरामध्ये शहरातील सात विविध दिव्यांग शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले. एकूण १७२ दिव्यांग विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच UDID प्रमाणपत्रासाठी नोंदणी, दिव्यांग आयुक्त कार्यालय आणि महिला व बाल विकास कार्यालयाकडील विविध शासकीय योजनांची माहिती देऊन अर्जही भरून घेण्यात आले.

या प्रसंगी प्रशांत पेठकर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांनी दिव्यांग बालकांचे हक्क, अधिकार, कर्तव्य तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला श्रीमती सुलोचना सोनवणे (दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, समाजकल्याण, सोलापूर), ॲड. बाबासाहेब जाधव (अध्यक्ष, विधीज्ञ बार असोसिएशन सोलापूर), श्रीमती रेश्मा गायकवाड (जिल्हा बालसंरक्षण अधिकारी), श्रीमती वैशाली भोसले (जिल्हा परिविक्षा अधिकारी), शशिभूषण यलगुलवार (प्रकल्प संचालक, दिव्यांग पुनर्वसन केंद्र सोलापूर) आणि डॉ. घुले (श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर) उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रामचंद्र कुलकर्णी, अधीक्षक, दिव्यांग अंध कार्यशाळा यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. शिव झुरळे, उपमुख्य, लोकअधिरक्षक कार्यालय, सोलापूर यांनी केले.

सदर शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी श्री. शमशोदद्दीन नदाफ (अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण), विजय माळवदकर (लिपीक), रितेश हिंगमीरे, प्रसन्न गुळेद, प्रविण विभुते, राहुल बिराजदार, शिवप्रसाद सुरपुरे, शाहरुख पिंडारी यांनी विशेष प्रयत्न केले.

या विशेष शिबीरातून दिव्यांग बालकांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरूकता मिळाली तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

  • Related Posts

    सोलापूरात ४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ; ४९ ज्येष्ठ वकिलांचा सहभाग

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – दि. ३० जुलै : मुख्य मध्यस्थी देखरेख समिती, मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४० तासांच्या मध्यस्थी…

    गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय मिळवून देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे ध्येय ,सचिव भाग्यश्री पाटील

    Spread the love

    Spread the loveसामाजिक समता सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशांचे वितरण धाराशिव -: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *