अनुसूचित जाती जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण व तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन.

Spread the love

छत्रपती संभाजीनगर  – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती नव उद्योजकांसाठी विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत सन 2024 25 करिता निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत मराठवाडा विभागामध्ये 320 नव उद्योजकांना निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम(REDP ) व तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (RTEDP)प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन विभागीय स्तरावर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात आले असून सदरील प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये उद्योग संधी, उद्योगाची निवड, उद्योगाचे व्यवस्थापन, लघुउद्योग, सेवा उद्योग, व्यापार उद्योग उद्योगातील विविध टप्पे, उद्योजकीय गुणसंपदा, उद्योगाची जाहिरात, मार्केटिंग, संवाद कौशल्य, प्रकल्प अहवाल, शासकीय कर्ज व अनुदान विषयक योजनांची माहिती, प्रत्यक्ष उद्योगांना भेटी, यशस्वी उद्योजकाचे मार्गदर्शन, उद्योगासाठी लागणारे परवाने, लायसन्स ,इत्यादी विषयावर निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार असून सदरील प्रशिक्षण कार्यक्रम हा दिनांक 10 मार्च 2025 ते 24 मार्च 2025 या कालावधी दरम्यान महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मुख्य कार्यालय छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात आली असून सदरील प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लाभार्थींचे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव तयार करण्यात येणार आहेत.
सदरील प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये धाराशिव जिल्ह्यातून 20 लाभार्थींची प्रत्यक्ष मुलाखती द्वारे निवड करून सदरील प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे.
तसेच तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण(RTEDP)कार्यक्रमांतर्गत 1) सीएनसी मशीननिंग(अनुसूचित जाती प्रवर्ग) 2)डीडी प्रिंटिंग अँड रिव्हर्स इंजीनियरिंग(अनुसूचित जाती प्रवर्ग)3) फूड अँड प्रोसेसिंग (अनुसूचित जमाती प्रवर्ग)4)सोलर पीव्ही टेक्निशियन(अनुसूचित जमाती प्रवर्ग) इत्यादी टेक्निकल प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात आले असून सदरील प्रशिक्षण कार्यक्रम हा दिनांक 17 मार्च 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधी दरम्यान महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मुख्य कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 45 दिवस निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामध्ये संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शनासह उद्योजकीय मार्गदर्शन करण्यात येणार आहे सदरील प्रशिक्षणासाठी धाराशिव जिल्ह्यातून प्रत्येक प्रशिक्षणासाठी 5 लाभार्थी याप्रमाणे 20 लाभार्थी प्रत्यक्ष मुलाखती द्वारे निवड करून प्रशिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात येणार आहेत.
सदरील प्रशिक्षण कार्यक्रमांमधून एसटी अनुसूचित जमाती प्रवर्गातील 20 लाभार्थी पाठवण्यात येणार असून एस सी अनुसूचित जाती प्रवर्गातील 20 लाभार्थी निवड करून संभाजीनगर येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहेत.
सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील होतकरू तरुण-तरुणींना प्रशिक्षणाद्वारे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये स्वतःचे करिअर करण्यासाठी संधी मिळणार आहे.
निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 7 मार्च 2025 असून त्याच दिवशी दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये प्रत्यक्ष मुलाखती द्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
तसेच तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2025 असून त्याच दिवशी दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये प्रवेश अर्ज भरलेल्या लाभार्थींची प्रत्यक्ष मुलाखती एमसीई डी द्वारा जिल्हा उद्योग केंद्र .महात्मा गांधी नगर धाराशिव या ठिकाणी निवड करण्यात येणार आहे.
वरील प्रशिक्षण कार्यक्रमाचा धाराशिव जिल्ह्यातील बेरोजगार होतकरू तरुण युवक युवतींनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री .अमोल बळे महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र..धाराशिव व प्रकल्प अधिकारी पांडुरंग मोरे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र धाराशिव तसेच श्री सुदाम थोटे विभागीय अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र छत्रपती संभाजी नगर यांनी केले आहे.

  • Related Posts

    मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमजिल्ह्याची ऐतिहासिक झेप : १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्हा उद्योग केंद्राने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या महत्त्वाकांक्षी योजनेत १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.हे…

    राज्यातील १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंढे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी

    Spread the love

    Spread the loveमुंबई : राज्य शासनाने आज मोठा प्रशासकीय फेरबदल करत १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांचाही समावेश…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *