बार्शी : बार्शी शहरातील तेलगिरणी चौक येथील आणि शिवाजी आखाडा या भागात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास दोन दुकाने फोडल्याची घटना उघड झाली आहे. चोरीमध्ये विश्वनाथ मेडिकल व बालवाडे इलेक्ट्रोनिक्स या दुकानांमधील पैसे, वस्तू आणि इतर मौल्यवान सामान लुटल्याची प्राथमिक माहिती आहे. चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही दुकाने बार्शी शहर पोलीस ठाण्या जवळून फक्त १०० मीटर अंतरावर आहे.
पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे आणि सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे, तसेच चोरट्यांचा लवकरच शोध लागेल अशी अपेक्षा आहे.