Spread the love

धाराशिव -: ( प्रतिनिधी )रुपामाता उद्योग समूहाच्या प्रधान कार्यालयात आज भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात श्री गणरायाचे मंगलमय आगमन झाले. गणरायाच्या आगमनाने कार्यालय परिसरात आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी ॲड. व्यंकटराव गुंड पाटील यांच्या हस्ते श्री गणरायाची विधिवत पूजा करून महाआरती करण्यात आली. उपस्थितांनी भक्तिभावाने गणरायाचे दर्शन घेतले आणि विघ्नहर्त्याच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, यश व प्रगतीसाठी मनोभावे प्रार्थना केली.
गणरायाच्या आगमनामुळे रुपामाता उद्योग समूहाच्या प्रधान कार्यालयात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी उपस्थितांनी “गणपती बाप्पा मोरया!” असा जयघोष करत बाप्पाचे स्वागत केले.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!